AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rhea Chakraborty Interrogation | “6 जूनपासून सुशांतच्या घरी होते, नंतर त्याने जायला सांगितलं, थेट आत्महत्येचं वृत्त आलं” रिया चक्रवर्तीचा जबाब

2017-2018 च्या दरम्यान आम्ही एक प्रॉडक्शन हाऊस सोडलं आणि वेगवेगळे काम करु लागलो. त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो." असं रिया चक्रवर्ती हिने सांगितलं. (Rhea Chakraborty Interrogation in Sushant Singh Rajput Suicide Case)

Rhea Chakraborty Interrogation | 6 जूनपासून सुशांतच्या घरी होते, नंतर त्याने जायला सांगितलं, थेट आत्महत्येचं वृत्त आलं रिया चक्रवर्तीचा जबाब
| Updated on: Jun 19, 2020 | 1:12 PM
Share

मुंबई : “6 जूनपासून मी सुशांतसोबत त्याच्या घरी होते. काही दिवसांनी त्याने मला तू तुझ्या घरी जा, मी एकट्याला राहायचं आहे, असं सांगितलं. त्याला एकांत हवा असेल म्हणून मी माझ्या घरी निघून आले. मात्र 14 जून रोजी त्याच्या आत्महत्येचं वृत्त समजताच मला धक्का बसला. तो या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं” असा जबाब अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने मुंबई पोलिसांना दिला आहे. (Rhea Chakraborty Interrogation in Sushant Singh Rajput Suicide Case)

रिया चक्रवर्ती हिची काल जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी त्याचे कर्मचारी, निकटवर्तीय आणि प्रियजनांसह 13 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

रिया चक्रवर्तीचा जबाब काय?

पहिली भेट

“माझी आणि सुशांतची 2013 मध्ये ओळख झाली. त्यावेळी सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’ नावाचा चित्रपट करत होता, तर मी ‘मेरे डॅडी की मारुती’ हा सिनेमा करत होते. या दोन्ही चित्रपटाचे सेट जवळ-जवळ होते. त्याच ठिकाणी आम्ही पहिल्यांदा भेटलो.” असं रिया चक्रवर्ती हिने सांगितलं.

तेव्हा सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये

“वेगवेगळ्या पार्टीमध्ये आमची भेट होत असे. एका पार्टीत आमची मैत्री झाली. आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर आम्ही एकमेकांना अधून मधून भेटत होतो. पण त्या काळात सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता.” अशी माहितीही रियाने दिली.

रिलेशनशिपला सुरुवात

“आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. नंतर 2017-2018 च्या दरम्यान आम्ही एक प्रॉडक्शन हाऊस सोडलं आणि वेगवेगळे काम करु लागलो. त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो.” असं रिया चक्रवर्ती हिने सांगितलं.

सुशांतच्या मनात सतत विचार

“सुशांतच्या मनात सतत काही ना काही विचार चालत असायचा. पण त्या गोष्टी तो कधी कोणाला सांगायचा नाही. त्याला काही टेंशन आल्यास तो एकांतवासात जायचा किंवा पुणे येथील पवनामधील त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन राहायचा. त्याला सतत डिप्रेशन येत होतं. त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला आणि त्यानंतर त्याला औषध घ्यावं लागलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने औषध घेणं बंद केलं होतं.” असा दावा रिया चक्रवर्ती हिने केला.

6 जूनपासून मी सुशांतसोबत त्याच्या घरी

“6 जूनपासून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी होते. काही दिवस राहिले. त्यावेळी पुन्हा तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने मला तू तुझ्या घरी जा, मी एकट्याला राहायचं आहे, असं सांगितलं. यानंतर मी त्याला सोडून माझ्या घरी निघून आले. त्याला एकांतवास हवा असेल म्हणून मी निघून आले. मात्र 14 जून रोजी त्याच्या आत्महत्येचं वृत्त समजताच मला धक्का बसला. तो या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं.” असंही रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना सांगितलं. (Rhea Chakraborty Interrogation in Sushant Singh Rajput Suicide Case)

यशराज फिल्म्सला पत्र

दरम्यान, यशराज फिल्म्ससोबत सुशांतचा काही चित्रपटांसाठी करार झाला होता. या करारपत्राची प्रत द्यावी याबाबत पोलिसांनी काल यशराज फिल्मच्या मॅनेजरला पत्र पाठवलं आहे. या कराराची प्रत आज पोलिसांना उपलब्ध होणार आहे.

यशराज फिल्म्ससोबत सुशांतचा काही चित्रपटांसाठी करार झाला होता, मात्र तो नंतर रद्द झाला होता. त्यामुळे सुशांत नाराज झाला होता, मनाने खचला होता, असं त्याच्या जवळच्या व्यक्तींनी जबाबात सांगितलं आहे.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

सुशांतच्या घरी विशेष गॉगल होता, प्रोफाईल मॅनेजरची माहिती, श्रुती मोदीचा पोलिसांत जबाब

मालकाच्या अकाली निधनाचा मूक जनावरालाही धक्का, सुशांतच्या लाडक्या कुत्र्याने जेवणही सोडलं

Sushant Singh Rajput Suicide Case | 13 जणांचे जबाब, ‘यशराज फिल्म्स’ला मुंबई पोलिसांचे पत्र

(Rhea Chakraborty Interrogation in Sushant Singh Rajput Suicide Case)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.