ओळखलंत का? मराठमोळी अभिनेत्री आणि संगीतकाराचे शुभमंगल!

लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक 11 जुलै रोजी लग्नाच्या बेडीत अडकले

ओळखलंत का? मराठमोळी अभिनेत्री आणि संगीतकाराचे शुभमंगल!

मुंबई : ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते विवाहबंधनात अडकली. संगीतकार आनंद ओक यांच्यासोबत शुभांगीने लगीनगाठ बांधली. (Actress Shubhangi Sadavarte Marries Music Director Anand Oak)

शुभांगी आणि आनंद यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. “जन्माच्या गाठी विधात्याने बांधलेल्या असतात असं म्हणतात. ही अनोखी गाठ विधात्यानेच बांधण्याचे ठरवले असावे म्हणून काल ही जन्मजन्मीची गाठ बांधली गेली..!! तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम पाठिशी असूदेत..!!” अशी पोस्ट शुभांगीने लिहिली आहे.

हेही वाचा : Tejpal Wagh Wedding | अभिनेता-लेखक तेजपाल वाघ विवाहबंधनात

अनेक मराठी कलाकार लॉकडाऊनमध्ये ‘लगीनघाई’ करताना दिसत आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर शुभांगी आणि आनंद या दोघांचा छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. 11 जुलै रोजी शुभांगी आणि आनंद लग्नाच्या बेडीत अडकले. सोहळ्यात दोघांनीही मास्क लावले होते. विवाह सोहळ्याला सदावर्ते आणि ओक कुटुंबातील मोजके नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होती.


शुभांगी सदावर्ते हिने प्राजक्त देशमुख दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ नाटकात आवलीची भूमिका साकारली आहे. या नाटकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आनंद ओक यांनी या नाटकाला संगीत दिले असून त्यांनाही अनेक बक्षिसे मिळाली आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सावित्रीज्योती’ मालिकेत शुभांगी सध्या चिमणामाई ही व्यक्तिरेखा साकारते. लॉकडाऊनच्या काळात मालिकेचे शूटिंग बंद होते. (Actress Shubhangi Sadavarte Marries Music Director Anand Oak)

संबंधित बातम्या :

तेजसने ना ‘बिग बॉस’ पाहिले, ना मालिका, ‘चि व चि. सौ. का.’ शर्मिष्ठा राऊतची लव्ह स्टोरी कशी बहरली?

(Actress Shubhangi Sadavarte Marries Music Director Anand Oak)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI