Tejpal Wagh Wedding | अभिनेता-लेखक तेजपाल वाघ विवाहबंधनात

साताऱ्यातील वाईमध्ये तेजपालचे 'लॉकडाऊन वेडिंग' झाले. या सोहळ्याला मोजकेच नातेवाईक आणि मित्रांना उपस्थिती लावता आली.

Tejpal Wagh Wedding | अभिनेता-लेखक तेजपाल वाघ विवाहबंधनात
Follow us
| Updated on: Jul 02, 2020 | 4:28 PM

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता, लेखक-दिग्दर्शक तेजपाल वाघ विवाहबंधनात अडकला. किरण घाडगेसोबत तेजपालने साताऱ्यात लगीनगाठ बांधली. (Marathi Actor Director Tejpal Wagh Wedding)

‘झी मराठी’ वाहिनीवर गाजलेल्या ‘लागीरं झालं जी’ या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी तेजपालने सांभाळली होती. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने यशात मोठा वाटा असलेला तेजपालही घराघरात पोहोचला.

साताऱ्यातील वाईमध्ये तेजपालचे ‘लॉकडाऊन वेडिंग’ झाले. या सोहळ्याला मोजकेच नातेवाईक आणि मित्रांना उपस्थिती लावता आली. ‘लागीरं झालं जी’ आणि ‘टोटल हुबलाक’ या मालिकेतील कलाकार लग्नाला हजर राहिल्याची माहिती आहे.

तेजपाल मूळ साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअ‍ॅलिटी शोच्या पहिल्या पर्वातून तेजपालने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं.

महाराष्ट्र फेवरेट कोण, शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा काही मालिकांचे लेखन त्याने केले. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ‘लागीरं झालं जी’ या मालिकेने.

‘तुझं तू माझं मी – टीटीएमएम’, ओली की सुकी अशा काही सिनेमांचे लेखन तेजपालने केले आहे. पळशीची पिटी या पुरस्कारप्राप्त चित्रपटात त्याने लेखनाश भूमिकाही केली होती. तर ‘रंगा पतंगा’ शिवाय ‘मेकअप’ या सिनेमात त्याने अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच्या भावाची व्यक्तिरेखा साकारली होती. (Marathi Actor Director Tejpal Wagh Wedding)

तेजपालच्या ‘वाघोबा प्रोडक्शन’ अंतर्गत ‘टोटल हुबलक’ ही मालिका सध्या सुरु असून त्याचे दिग्दर्शन तेजपाल करतो.

दहा दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा नुकताच साखरपुडा झाला. लॉकडाऊनचे काही नियम शिथिल झाल्याने नाशिकमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत शर्मिष्ठाने साखरपुडा केला. इगतपुरीच्या रिसोर्टमध्ये हा समारंभ झाला.

(Marathi Actor Director Tejpal Wagh Wedding)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.