…आणि तापसीने चाहत्याच्या कानशिलात लगावली!

तापसी पन्नू ही नेहमी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारते. कधी ती सिनेमांमध्ये हिरोंप्रमाणे अॅक्शन करताना दिसते, तर कधी अगदीच अल्लड मुलीची भूमिका रंगवते. तापसी ऑन स्क्रिन कितीही थरारक भूमिका साकारत असली, तरी ती ऑफ स्क्रिन अगदी शांत आणि कूल असते. मात्र, तापसीच्या आयुष्यात एक प्रसंग असाही घडला जेव्हा तापसीचा रौद्रावतार पाहायला मिळाला.

...आणि तापसीने चाहत्याच्या कानशिलात लगावली!
Nupur Chilkulwar

|

Jun 24, 2019 | 10:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही जितकी सुंदर आहे, तितकाच दमदार तिचा अभिनय आहे. ‘मुल्क’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ आणि ‘मनमर्जियां’ यांसारख्या सिनेमांमध्ये तिने केलेला अभिनय खरंच कौतुकास्पद होता. तापसी पन्नू ही नेहमी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारते. कधी ती सिनेमांमध्ये हिरोंप्रमाणे अॅक्शन करताना दिसते, तर कधी अगदीच अल्लड मुलीची भूमिका रंगवते. तापसी ऑन स्क्रिन कितीही थरारक भूमिका साकारत असली, तरी ती ऑफ स्क्रिन अगदी शांत आणि कूल असते. मात्र, तापसीच्या आयुष्यात एक प्रसंग असाही घडला जेव्हा तापसीचा रौद्रावतार पाहायला मिळाला.

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, तापसी तिच्या ‘मनमर्जियां’ या सिनेमाचं शूटिंग करत होती. शूटिंग दरम्यान ती तिच्या बहिणीसोबत डिनरवर गेली होती. डिनर झाल्यावर तापसी आणि तिची बहीण फुटपाथवर ड्रायव्हरची वाट पाहात होते. तेव्हाच एक मुलगा चलाखी करत त्यांच्या समोर उभा राहून फोटो काढत होता. हे पाहून तापसी संतापली आणि तिने या मुलाला थप्पड लगावला.

तापसी तिच्या कुठल्याही भूमिकेत पूर्णपणे वाहून जाते. ती तिच्या भूमिका रंगवताना 90 टक्के गूण आसपासच्या लोकांमधून घेते आणि 10 टक्के हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो. या मुलाला थप्पड लगावताना तापसी स्वत:ला ‘मनमर्जियां’ सिनेमातील ‘रुमी’च्या भूमिकेत पाहात होती.

त्या मुलाला थप्पड लगावल्यानंतर तापसीने त्याचा फोन हिसकावून घेतला आणि त्याला ते सर्व फोटो डिलिट करायला सांगितले. इतकंच नाही, तर फोटो डिलिट केले नाही तर फोन तोडण्याची धमकी तापसीने त्या मुलाला दिली.

सध्या तापसी पन्नूने ‘गेमओव्हर’ या सिनेमात काम केलं. हा सिनेमा तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तापसी पूर्णवेळ एका व्हिलचेअरवर असते. तापसीने पहिल्यांदाच अशी भूमिका साकारली आहे. अश्विन सरवननने या सिनोमाचं दिग्दर्शन केलं. तसचे, तापसी लवकरच ‘सांड की आंख’ या सिनेमात दिसणार आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

संबंधित बातम्या :

…म्हणून सध्या शाहरुख सिनेमांपासून दूर!

बिकिनी घालून मॉडेलच्या टीम इंडियाला ‘हॉट’ शुभेच्छा, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 13 : 26 दिवसांसाठी सलमानला तब्बल 403 कोटी

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेचा जामीन नामंजूर, कोर्टात काय घडलं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें