पीपीई किट घालून रणरागिणी स्मशानभूमीत, कराडच्या नगराध्यक्षांची कौतुकास्पद कामगिरी

कोरोना काळात काम करत असलेले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर मृत कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्काराची मोठी जबाबदारी आहे (Mayor Rohini Shinde Karad).

पीपीई किट घालून रणरागिणी स्मशानभूमीत, कराडच्या नगराध्यक्षांची कौतुकास्पद कामगिरी

कराड : कोरोना काळात काम करत असलेले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर मृत कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्काराची मोठी जबाबदारी आहे (Mayor Rohini Shinde Karad). गेल्या काही महिन्यात मोठ्या संख्येने लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कराड नगरपालिका कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कराड नगरपालिकेच्या महिला नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी स्वत: पीपीई किट घालत कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यावेळी त्यांच्यासोबत नगरपालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते. त्यांच्या या कृतीमुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे (Mayor Rohini Shinde Karad).

रोहिणी शिंदे यांनी स्वत: पीपीई किट घालून कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याने कराड पालिकेच्या कोव्हिड योध्दा कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढले आहे. तसेच त्यांनी नगराध्यक्षांचे आभारही मानले आहेत. या रणरागिणीचा प्रत्येक कराडकराला अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया कराडमधून व्यक्त होत आहेत.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या स्वत: जनतेतून निवडून आलेल्या आहेत. रोहिणी यांनी कोव्हिड स्मशानभूमीत जाऊन एकूण चार कोरोनाबाधित मृतदेहांवर पीपीई किट घालून अंत्यसंस्कार केले.

कराड शहरातील नगरपालिकेचे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून अविरत अंत्यसंस्काराचे काम करत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा प्रचंड शारिरिक मानसिक ताण असल्याने या कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी मनोबल वाढावे यासाठी नगराध्यक्षांनी स्मशानभूमीत जाऊन हे पाऊल उचलले.

कोरोनाकाळात असे प्रेरणादायी काम करणाऱ्या त्या राज्यातील एकमेव नगराध्यक्षा असाव्यात. कराडच्या महिला नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या कोरोनाच्या सुरुवातीपासून कोरोनाविरोधात लढण्यासाठी आघाडीवर होत्या. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून उचलेल्या पाऊलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लॉकडाऊन काळात थेट जनतेत असल्याने त्यांही कोरोनाबाधित झाल्या होत्या. संपूर्ण कुटुंबासह नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात करुन पुन्हा कराडकरांच्या सेवेत हजर झाल्या आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे शहरावर येणाऱ्या प्रत्येक कसोटीवर मात करण्यासाठी पहिल्या दिवसांपासून जीवाची परवा न करता संकटावर तुटून पडणाऱ्या या रणरागिणीचा अभिमान प्रत्येक कराडकराला असल्याच्या प्रतिक्रिया कराड मधून व्यक्त होत आहेत.

संबंधित बातम्या :

नागपूरकरांवर आता ‘एनडीएस’ पथकाची नजर, बाजारपेठेत गर्दी केल्यास कारवाई

बाबांनो लाईटली घेऊ नका, पुण्यात डिसेंबर-जानेवारीत दुसरी लाट येण्याचा अंदाज : अजित पवार

Published On - 1:30 pm, Sat, 17 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI