AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील शेतीविषयक घडामोडी: पपईला विषाणूजन्य रोगाचा फटका, कांदा, संत्र्याच्या भावात घसरण

महाराष्ट्रात रब्बी हंगाम सुरु आहे. अनेक ठिकाणी लांबलेल्या पावसाचा शेतीला फटका बसल्याचे दिसते. (Agriculture News Maharashtra)

महाराष्ट्रातील शेतीविषयक घडामोडी: पपईला विषाणूजन्य रोगाचा फटका, कांदा, संत्र्याच्या भावात घसरण
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 09, 2020 | 4:58 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात रब्बी हंगाम सुरु आहे. अनेक ठिकाणी लांबलेल्या पावसाचा शेतीला फटका बसल्याचे दिसते. बाजारात येणाऱ्या मालांचे भाव पडले आहेत. तर, अतिवृष्टीचा सोयाबीन पिकालाही फटका आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी प्रमाणात होत आहे. नागपूरला संत्र्याचे भाव गडगडले आहेत तर नंदुरबारमधील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. हिंगोलीत सोयाबीनची आवक कमी प्रमाणात झालीय. चाळीस गावात कांद्याचे भाव पडले आहेत. (Agriculture news in Maharashtra onion  and orange rates down)

नंदुरबारमध्ये पपई उतपादक शेतकरी संकटात

पपई उत्पादनात आघाडीवर असणारा जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जाते. यावर्षी अनेक कारणांनी पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जास्त पावसामुळे वातावरणात आर्द्रता टिकून राहिल्यानं पपईवर विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पपई पिकाची पानगळ होऊन फळे उघडे पडू लागली आहेत. वातावरणातील उष्णता कायम असल्याने फळे खराब होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी आता फळाच्या संरक्षणासाठी गोणपाट आणि पॉलिथिन पेपरचे आच्छादनाद्वारे पपईची फळे झाकण्यास सुरुवात केली आहे. सूर्यप्रकाशापासून फळांचा संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी या उपाययोजना सुरू केल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्रातील पपई पिकाचे अभ्यास प्राध्यापक कुंडे यांनी पीक संरक्षण आणि फळ संगोपन या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे. (Agriculture news in Maharashtra onion  and orange rates down)

चाळीसगावात कांद्याचे दर गडगडले

जळगाव जिल्ह्यात कांद्याची अवाक वाढल्याने चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाळीसगाव बाजारात आज नवा कांदा 3 हजार ते 3100 रुपये तर जुना कांदा 16 ते 1800 रुपये क्विंटल जात आहे. नव्या कांद्याची आवक वाढल्याने कांद्याची घसरण झाल्याचं सागितलं जात आहे.

जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्यांच्या दरात मोठी घसरण

जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नागपुरातील कळमना ठोक फळबाजारात सध्या संत्र्याचे दर ८ ते १५ रुपये किलोपर्यंत घसरलेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत संत्र्याला सध्या निम्मा दर मिळतोय. दर पडल्याने संत्राउत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे संत्राउत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. किरकोळ बाजारात संत्री महाग आहे. पण, ठोक बाजारात शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळतोय. त्यामुळे संत्राउत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय.(Agriculture news in Maharashtra onion  and orange rates down)

हिंगोलीत सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका

हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन पिकाचे क्षेत्र 2 लाख हेक्टर एवढे असते.यंदा त्यात 35 हजार हेक्टरची वाढ झाली. मात्र, पीक काढणी सुरू असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टीच्या फटक्यामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे.

गतवर्षी बाजार समितीमध्ये दरोज तीन ते चार हजार पोती आवक होत होती. यावर्षी ही आवक हजार पोत्यांवर येऊन ठेपली आहे. गतवर्षी ऑकटोबर व नोव्हेंबरमध्ये1 लाख 2 हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीने खरेदी केले होते. यंदा मात्र या दोन महिन्यात फक्त 56 हजार क्विंटलची खरेदी झालेली आहे. त्यामुळे तब्बल 40 टक्क्यांनी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. (Agriculture news in Maharashtra onion  and orange rates down)

संबंधित बातम्या:

दरवाढीचा भडका! महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोलचे भाव 90 पार; डिझेलही 80च्या पुढे

भारत बंदमुळे आज भाज्यांचे दर कडाडले, वाचा आजचे ताजे भाव

Bharat Bandh | सांगलीत काँग्रेसकडून केंद्र सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट

(Agriculture news in Maharashtra onion  and orange rates down)

Follow Us
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!