AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगरमधील प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली

आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 29, 2020 | 5:27 PM
Share

शिर्डी : प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील प्रवरा येथे असलेला हा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ विखेंच्या गळ्यात बिनविरोध पडली. (Pravara Sugar Factory Chairman)

अहमदनगर जिल्ह्यात विखे कुटुंबाचं मोठं प्रस्थ आहे. सहकार आणि संस्थांच्या माध्यमातून विखे कुटुंबाने अहमदनगरच्या राजकारणात पाऊल ठेवलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. विठ्ठलरावांनी 1915 पासून अहमदनगरमधल्या प्रवरा परिसरात सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरवलं आहे.

प्रवरा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास

17 जून 1950 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर (लोणी) मध्ये आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरचा पहिला साखर कारखाना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला.

सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर 1964 मध्ये विखे कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. विठ्ठलराव विखे यांनी ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. त्यानंतर त्यांचे पुत्र बाळासाहेब विखे अर्थात राधाकृष्ण यांचे वडील 1962 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.

राधाकृष्ण विखे पाटील – काँग्रेस ते भाजप

राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झाले होते. 4 जून 2019 रोजी त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर जुलै महिन्यात ते भाजपमध्ये सहभागी झाले. काही महिने त्यांनी गृहनिर्माण मंत्रिपदाची धुराही सांभाळली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर ते शिर्डीतून पुन्हा आमदारपदी निवडून आले. मात्र भाजपला सत्ता राखता न आल्याने त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.

Pravara Sugar Factory Chairman

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...