ऐ मेरे वतन के लोगों…गाणं सॅक्सोफोनवर वाजवून पोलिस शिपायाने वाहिली श्रध्दांजली, व्हिडीओ व्हायरल

हा अप्रतिम श्रद्धांजली व्हिडिओ भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे

ऐ मेरे वतन के लोगों...गाणं सॅक्सोफोनवर वाजवून पोलिस शिपायाने वाहिली श्रध्दांजली, व्हिडीओ व्हायरल
लता मंगेशकर
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 2:26 PM

मुंबई – ऐ मेरे वतन के लोगों…गाणं कुठेही वाजलं की तुम्हाला पटकनं लता मंगेशकरांची (lata mangeshkar) आठवण होते, हे गाणं सुरूवातीला इतकं प्रसिध्द झालं होतं की, अनेकांना हे गाण ऐकताना रडू यायचं. लता मंगेशकरांच्या आवाजातलं हे गाण ऐकण्यासाठी लोकांची उत्सुकता असायची. ज्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ( Pandit Jawaharlal Nehru) यांनी लता मंगेशकरांच्या आवाजातलं हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांच्या सुध्दा डोळ्यात पाणी आलं होतं. आज लता मंगेशकर यांनी मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी हे गाणं वाजवून त्यांना श्रध्दांजली वाहिली जात आहे.तसेच भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील एका पोलिस दलातील एका पोलिस शिपायाने ऐ मेरे वतन के लोगों…गाणं सॅक्सोफोनवर (Saxophone) वाजवून लता दीदींना अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. शिपायाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून लोकांच्या पसंतीला पडला आहे.

हा अप्रतिम श्रद्धांजली व्हिडिओ भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे, ‘आये मेरे वतन के लोगों… कॉन्स्टेबल मुझम्मल हक, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाकडून स्वर कोकिला भारतरत्न लता मंगेशकर यांना हार्दिक श्रद्धांजली’ अशी श्रध्दांजली त्यांनी वाहिली आहे. आज देशातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली आहे. कोरोना झाल्यानंतर उपचारासाठी रूग्णालयात दाखल झालेल्या लता दीदी यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

हे अनेकांना माहित नसेल, तर जाणून घ्या की, कवी प्रदीप यांनी ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे लिहिले आहे. या गाण्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे. सुरूवातीला लता मंगेशकरांनी हे गाणं वाचलं तेव्हा रडू लागल्या. तसेच जेव्हा लता मंगेशकरांच्या आवाजात हे गाणं देशाने ऐकलं तेव्हा देश रडू लागला होता. आजही तुम्ही ते गाणं ऐकत असाल तर तुमच्या डोळ्यात पाणी तरळत असेल.

लता मंगेशकर नावाचं पर्व आज संपलं. त्यांच्या जाण्याने आज भारत पोरका झाला. मात्र त्यांचा आवाज कायम या जगात राहिल. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.

रिजेक्ट झालेलं गाणं लतादीदींनी गायलं, ‘लग जा गले’ अजरामर ठरलं, 60 वर्षानंतरही रसिकांच्या ओठावरचं गाणं!

Lata Mangeshkar Saree Collection : लता मंगेशकरांना या साड्यांची होती आवड, त्यांनी आपल्या साधेपणातही जिंकली होती रसिकांची मने

वर्ल्डकप विजेत्या संघासाठी BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लतादीदींनी दिलेला मदतीचा हात

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.