Aishwarya Rai Corona | ऐश्वर्या आणि आराध्याही नानावटी रुग्णालयात दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Aishwarya Rai Corona | ऐश्वर्या आणि आराध्याही नानावटी रुग्णालयात दाखल

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Aishwarya Rai Bachchan And Aaradhya Admitted In Hospital) यांच्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या आणि आराध्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते.

यापूर्वी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या शनिवारी (11 जुलै) रात्री त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. अमिताभ बच्चन आणि अभिषेकला शनिवारी रात्रीच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोनाला संसर्ग झाल्याचं रविवारी (12 जुलै) समोर आलं होतं. मात्र, या दोघींमध्येही कोरोनाची लक्षणं नसल्याने त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं होतं. मात्र, या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती आहे.

बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत (Aishwarya Rai Bachchan And Aaradhya Admitted In Hospital).

बच्चन पिता-पुत्रांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवालात ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट

“माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

“तसेच गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी,” असेही बिग बींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

अभिषेक बच्चन यांचे ट्विट

“माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती ट्विट करत अभिषेक बच्चन यांनी दिली.

Aishwarya Rai Bachchan And Aaradhya Admitted In Hospital

संबंधित बातम्या :

Aishwarya Rai Corona | बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, ऐश्वर्या-आराध्या यांनाही संसर्ग

Bachchan Family Corona: जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वस्ता, बच्चन कुटुंबाच्या बंगल्यातील 56 जण होम क्वारंटाईन

Published On - 11:17 pm, Fri, 17 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI