आमदार रवी राणा यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात अॅडमिट

दोन दिवसांपूर्वी अचानक रवी राणा यांना 103-104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे (Amravati MLA Ravi Rana Hospitalised)

आमदार रवी राणा यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात अॅडमिट

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती बिघडली आहे. आमदार राणा यांना खासगी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. (Amravati MLA Ravi Rana Hospitalised)

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी सातत्याने दौरे केले होते. त्यांच्या पत्नी आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणाही यामध्ये सहभागी होत्या. दोन दिवसांपूर्वी अचानक रवी राणा यांना 103-104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या.

नवनीत राणा यांनी रवी राणा यांच्यावर उपचारासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आनंद काकाणी यांना निवासस्थानी पाचारण केले होते. प्राथमिक तपासणी करुन डॉक्टर काकाणी यांनी रवी राणा यांच्यावर औषधोपचार सुरु केले. त्यानंतर राणा यांना अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘त्या’ माऊलीचा हंबरडा ऐकून नवनीत राणाही गहिवरल्या

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या घशातील स्रावाचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे, त्याचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तूर्तास या दोघांनाही ‘कोरोना संशयित’ म्हणता येणार नाही, असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राणा दाम्पत्य 21 मार्चला दिल्लीहून परतले होते. त्यानंतर दोघांनी स्वतःला घरातच काही दिवस ‘क्वारंटाईन’ करुन घेतलं होतं. ‘कोरोना’ग्रस्त बॉलिवूड गायिकेच्या पार्टीला हजेरी लावलेल्या एका खासदाराच्या संपर्कात आल्याने दोघांनी ही खबरदारी घेतली होती.

(Amravati MLA Ravi Rana Hospitalised)

Published On - 11:48 am, Sun, 19 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI