विदर्भातील काश्मिरात धुक्याची चादर, चिखलदरा पर्यटकांनी फुलले

धुक्यात हरवलेली वाट...आडवळणाचा रस्ता...रस्त्याच्या चोहीकडे सर्वत्र हिरवळ... लांबच लांब पर्वत रांगा... हे अल्लादायक दृश्य विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील चिखलदरा येथील आहे.

विदर्भातील काश्मिरात धुक्याची चादर, चिखलदरा पर्यटकांनी फुलले
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 1:57 PM

अमरावती : धुक्यात हरवलेली वाट…आडवळणाचा रस्ता…रस्त्याच्या चोहीकडे सर्वत्र हिरवळ… लांबच लांब पर्वत रांगा… हे आल्हाददायक दृश्य विदर्भातील काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरात आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये असलेल्या चिखलदऱ्यात पर्यटकांनी सध्या मोठी गर्दी येथे केली आहे. मागील काही दिवसांपासून मेळघाटात परतीचा पाऊस बरसत असल्याने सर्वदूर धुक्याची चादर पसरली आहे. चिखलदऱ्यात चार दिवसांपासून धुकेच धुके असल्याने हाकेच्या अंतरावर असलेली व्यक्तीही दिसेनाशी होत आहे. चिखलदरामधील असलेले सर्व पर्यटन स्थळं गर्दीने बहरलेली असून कोरोनाचे सर्व नियम पाळून येते पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. (Amravati Hill Station Chikhaldara flooded with tourists as fog continues)

लॉकडाऊनच्या काळात “घरातच रहा सुरक्षित रहा” हा नारा असल्याने अनेकजण घरीच होते. आता अनलॉकिंगच्या टप्प्यात नागरिकांनी हळूहळू घराबाहेर पडत आपली कामं पुन्हा सुरु केली आहेत. मेळघाटातील सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या चिखलदरा परिसरातही पर्यटकांनी गर्दी केली आहे. नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेले चिखलदरा लॉकडाऊनच्या काळात सुनेसुने झाले होते. मात्र आता पर्यटक परतल्यामुळे स्थानिकांचा रोजगार सुरु झालाय. गेल्या सहा महिन्यांपेक्षाही अधिक कालावधीपासून चिखलदरा पर्यटन स्थळांकडे पर्यटक फिरकले नव्हते मात्र, आता पर्यटकांमुळे चिखलदरा भरुन गेला आहे.

चिखलदरा येथे असलेली जंगल सफारी पर्यटकांची आवडती आहे. सोबतच पुरातन काळात वसलेलं देवीचं मंदिर. मात्र देऊळ सध्या बंद असल्याने देवी पॉइंटवर पर्यटकांची ये-जा नाही . परंतु, देवी पॉईंटला लागून असलेला शक्कर तलावाजवळ पर्यटकांची हळूहळू गर्दी व्हायला लागली आहे. या ठिकाणी बोटिंग सुविधा असल्याने पर्यटक मनसोक्त आनंद घेत आहेत. त्यामुळे विदर्भातील नंदनवनावर पुन्हा एकदा पर्यटकांची मेहेरनजर पडताना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

खासदार नवनीत राणांकडून रस्त्याच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची झाडाझडती

काश्मीरसाठी बजेट नाही? चिखलदऱ्याला जा, काश्मीरचा फिल घ्या!

(Amravati Hill Station Chikhaldara flooded with tourists as fog continues)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.