‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर त्यांचं नवं गाणं पोस्ट केलं आहे.

'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर त्यांचं नवं गाणं पोस्ट केलं आहे (New Song of Amruta Fadnavis on Valentine Day). त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांचं हे इंग्रजी गाणं ‘लिओनेल रिची’चं कव्हर व्हर्जन आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मुळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.


अमृता फडणवीस यांनी हे गाणं पोस्ट करताना हे आपलं आवडतं गाणं असल्याचं म्हटलं. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.


अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सकाळीच गाणं युट्यूबवर पोस्ट केलं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी आपलं हे गाणं सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ट्विटरवर टाकलं.

संबंधित बातम्या:

बाळासाहेबांचं खरं स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा : अमृता फडणवीस

मुंबईतील नाईट लाईफवर अमृता फडणवीस म्हणतात…

जागो महाराष्ट्र ! अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका
New Song of Amruta Fadnavis on Valentine Day

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI