मुंबईतील नाईट लाईफवर अमृता फडणवीस म्हणतात…

सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असेल. यामध्ये काही तथ्यही नसेल," असेही अमृता फडणवीस (Amruta fadnavis comment on nightlife) म्हणाल्या.

मुंबईतील नाईट लाईफवर अमृता फडणवीस म्हणतात...

पुणे : “मुंबईतील नाईट लाईफविषयी अद्याप काहीही विचार केलेला नाही. यात सुरक्षा कशी घेतली जाईल? याबाबत विचार करावा लागेल,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी (Amruta fadnavis comment on nightlife) दिली. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“आज महिला दिवस-रात्र काम करतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान वाटतो. मुंबईसारखे अनुकरण दुसऱ्या शहरांनीदेखील करावं,” असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षासाठी आता नवीन दिशा ठरवली आहे. ते पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील,” असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

“मनसेच्या नव्या झेंड्याबाबत तुम्हाला काय वाटत यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, राज ठाकरेंच्या नवी दिशा पाहिली त्याचे कौतुक, ते खूप चांगलं काम करतील. माझ्यासारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची गरज असते. त्यांना फॉलो करण्याची गरज असते, त्यामुळे आता आपल्याला खऱ्या नेत्याची खूप गरज आहे,” असंही त्या यावेळी (Amruta fadnavis comment on nightlife) म्हणाल्या.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतल्याबाबत मला काही माहिती नसून सत्यतता पडताळावी लागले. त्यांची सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असेल. यामध्ये काही तथ्यही नसेल,” असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

“भाजपा सरकारच्या काळात विरोधी पक्षांच्या नेत्याच्या फोन टॅपिंग प्रकरणावरही अमृता फडणवीसांनी भाष्य केले. “या तिन्ही पक्षांना भाजपा नको आहे. त्यामुळे ते भाजपवर खोटे आरोप करत आहेत. या आधीच्या सरकारमध्ये शिवसेनादेखील होती. त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल,” असंही त्या (Amruta fadnavis comment on nightlife) म्हणाल्या.