जागो महाराष्ट्र ! अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा (Amruta Fadnavis tweet on uddhav thackeray)  साधला आहे.

जागो महाराष्ट्र ! अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा (Amruta Fadnavis tweet on uddhav thackeray)  साधला आहे. “चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी अनेकदा शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून सडकून टीका झाली (Amruta Fadnavis tweet on uddhav thackeray)  होती.

“वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही. पण वाईट नेता कायम ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष, जागो महाराष्ट्र !” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. इकोनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी हे ट्विट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. ‘राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय आहे! वीर सावरकर आणि त्यांची महानता किंवा सत्कार्यांच्या जवळपासही राहुल गांधी पोहचत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असं ट्वीट फडणवीसांनी केलं (Amruta Fadnavis tweet on uddhav thackeray)  होतं.

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं”,  असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

या ट्विटनंतर शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं. इतकंच नाही तर अमृता फडणवीस हाय हाय अशी घोषणाबाजीही सेना महिला आघाडीने (Amruta Fadnavis tweet on uddhav thackeray)  दिली.

यानंतरही शिवसेना महिला आघाडीच्या या आंदोलनाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस म्हणतात, लोकांच्या माथी मारुन तुम्ही नेतृत्व सिद्ध करु शकत नाही, तो एक हल्ला असतो, नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !” असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या : 

दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्ला

सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, शिवसेना नगरसेवकाचा अमृता फडणवीसांवर पलटवार

ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Published On - 10:44 am, Sun, 29 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI