आनंदवार्ताः ठाण्यातल्या सिरो सर्वेक्षणात 90.64 % नागरिकांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज; महिला पुरुषांच्या पुढे

ठाणे महापालिकेच्या वतीने 12 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात जवळपास 1 हजार 571 नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले गेले. त्यातून 1 हजार 424 जणांमध्ये अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

आनंदवार्ताः ठाण्यातल्या सिरो सर्वेक्षणात 90.64 % नागरिकांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज; महिला पुरुषांच्या पुढे
प्रातिनिधीक छायाचित्र

ठाणेः कोरोनाच्या (Corona) सगळीकडून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांमध्ये एक आशेची पणती तेवती ठेवणारी आणि आनंदी करणारी बातमी. ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation’s) सिरो सर्वेक्षणाचा अहवाल आता आला असून, त्यात तब्बल 90.64 % नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळल्या आहेत. विशेष म्हणजे अँटीबॉडीज निर्मितीमध्ये महिला या पुरुषांच्या पुढे आहेत. एकीकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूने जगाला पुन्हा एकदा भयाच्या दरवाज्यात उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे.

या लोकांचे झाले सर्वेक्षण

ठाणे महापालिकेच्या वतीने 12 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात जवळपास 1 हजार 571 नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले गेले. त्यातून 1 हजार 424 जणांमध्ये अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्यात उथळसरमध्ये 90.07 %, मुंब्रा येथे 92.81 % नागरिकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचे समोर आले आहे.

पुरुष पिछाडीवर

विशेष म्हणजे अँटीबॉडी तयार होण्याच्या प्रक्रियेत महिला या पुरुषांच्या पुढे आहेत. 89.61 % पुरुषांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. महिलांमध्ये हेच प्रमाण 91.91 टक्के असल्याचे समोर आले आहे. जे नागरिक इतरांच्या संपर्कात कमी राहिले, त्यांच्यामध्ये कमी अँटीबॉडी तयार झाल्याचे निरीक्षण या सिरो सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. ज्यांचे लसीकरण झाले आहे, अशा 7 % लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या नसल्याचेही समोर आले आहे.

झोपडपट्टी भाग मागे

झोपडपट्टी भागात राहणाऱ्यांपेक्षा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये अँटीबॉडीज अधिक आढळ्या आहेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या 93.32 % आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 88.12 % नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. 6 ते 17 वयोगटातील 83.43 % मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. 31 ते 45 वयोगटातील 94.03 % लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे.

जगभर भीतीचे सावट

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन वेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. ओमिक्रॉनला डेल्टा वेरिएंट पेक्षा सातपट जास्त संक्रामक सांगितले जात आहे. ओमिक्रॉन ज्या दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. तिथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी होत आहे. यामुळे आफ्रिकन मेडिकल असोसिएशनने ओमिक्रॉन विषाणू त्यांच्या देशात गेल्या दोन महिन्यांपासून असून त्यामध्ये 45 वेळा बदल झाल्याचं सांगितले आहे.

इतर बातम्याः

नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, पठारे यांचे खडेबोल

साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 50 ग्रंथाचे प्रकाशन; 26 ग्रंथ मराठी, 14 ग्रंथ इंग्रजी आणि 10 ग्रंथ हिंदी भाषेत

Nashik| भाजप मंडल अध्यक्ष खुनातील संशयित बर्वेला 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, इतर संशयितांचा तपास सुरू

Published On - 12:31 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI