काश्मीरमधील सफरचंदाची नाशिकमध्ये लागवड, डाळींबासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सफरचंदाची बाग

नाशिकच्या देवळा तालुक्यातील उष्ण तापमान असलेल्या वाजगावमध्ये आता सफरचंदाची बाग फुलविली आहे. (Apple Planting in Nashik devala district)

काश्मीरमधील सफरचंदाची नाशिकमध्ये लागवड, डाळींबासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सफरचंदाची बाग
फोटो प्रातनिधिक

नाशिक : नाशिक जिल्हा हा कांदा, द्राक्षं आणि डाळींबासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. त्यात ही जिल्ह्यातील देवळा तालुका हा तर डाळींबासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. पण याच देवळाच्या मानरानावर एका प्रगतशील शेतकऱ्यांनी काश्मीरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकणाऱ्या चक्क सफरचंदाची बाग फुलविली आहे. आता या बागेत सफरचंद यायला सुरुवात झाली आहे. (Apple Planting in Nashik devala district)

सफरचंद म्हटले तर काश्मीरच्या आणि हिमाचल प्रदेशात असलेल्या सफरचंदाच्या बागा डोळ्यासमोर येतात. मात्र नाशिकच्या देवळा तालुक्यातील उष्ण तापमान असलेल्या वाजगावमध्ये आता सफरचंदाची बाग फुलविली आहे. देवळ्यातील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब देवरे यांनी ही किमया साधली आहे.

देवरे यांचा सुरुवातीपासून शेतीत नवनवे प्रयोग करत असतात. सहा भावंडे मिळून त्यांची 70 एकर शेतजमीन आहे. सुरुवातीला त्यांनी डाळींबाची लागवड केली. डाळींबाने त्यांना भरभराटही दिली. मात्र तेल्या रोगाने होत्याचे नव्हते झाले. मात्र खचून न जाता त्यांनी डाळींबाला पर्याय म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास करून फळबागांकडे वळण्याचा निर्णय घेतला. नारळ, सीताफळ,आंबा, पेरु, द्राक्षं अशा विविध फळबागांचा प्रयोग यशस्वी केला.

एकदा ते हिमाचल परदेशात पर्यटनाला गेले असताना त्यांनी त्याठिकाणी सफरचंदाच्या बागा पाहिल्या आणि सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अभ्यास केला आणि मार्गदर्शन ही घेतले. साधारणतः 40 ते 45 डिग्री तापमानात येणाऱ्या हरमन-99 जातीच्या रोपांची त्यांनी निवड केली. 25 आर क्षेत्रावर त्यांनी 225 रोपांची लागवड केली. त्यानंतर वर्षभरात या बागेत आता सफरचंदाची फळधारणा झाली आहे. विशेष म्हणजे या फळांना चांगला रंग आणि चव आहे. पुढच्या काळात आता मोठ्या प्रमाणावर सफरचंदाचे उत्पन्न येण्याची त्यांना आशा आहे.

देवळ्यासारख्या माळरानावर बाळासाहेब देवरे यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. देवरे यांची सफरचंदाची बाग पाहण्यासाठी अनेक शेतकरी या बागेला भेट देत आहे. प्रामुख्याने हंगामी पिक आणि डाळींब उत्पादनात आघाडीवर असलेल्या देवळा तालुक्यातील वाजगावत सफरचंदाची बाग फुलल्याने परिसरातील शेतकऱ्यांना एक नवा पर्याय निर्माण झाला आहे. (Apple Planting in Nashik devala district)

संबंधित बातम्या : 

थायलंडमध्ये विकसित चाऱ्याची नेवाशात लागवड, सोमेश्वररावांना लॉकडाऊनमध्ये चार लाखांचा नफा

औरंगाबादेत मका, बाजरी, कापूस, तुरीवर नाकतोड्याची धाड

Published On - 8:45 pm, Tue, 8 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI