AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद-जालन्यातील तीन गावात कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा

क्लाऊड सीडिंग केल्यानंतर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील तीन गावात कृत्रिम पाऊस (Artificial rain aurangabad) पाडला असल्याचा दावा प्रशासनाने केलाय. हातखेडा, बेळगाव, भटाना या गावात पाऊस पडल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

औरंगाबाद-जालन्यातील तीन गावात कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा
| Edited By: | Updated on: Aug 21, 2019 | 7:37 AM
Share

औरंगाबाद : अमेरिकेहून मागवलेल्या विमानातून मराठवाड्यात कृत्रिम पाऊस (Artificial rain aurangabad) पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ढगांचा अंदाज घेऊन क्लाऊड सीडिंग केल्यानंतर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील तीन गावात कृत्रिम पाऊस (Artificial rain aurangabad) पाडला असल्याचा दावा प्रशासनाने केलाय. हातखेडा, बेळगाव, भटाना या गावात पाऊस पडल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

9 ऑगस्ट रोजी सुरु केलेला प्रयोग फेल गेल्यानंतर अमेरिकेहून विमान मागवलं होतं. अमेरिकेचं विमान रविवारी हजर झालं. सोमवारी उड्डाण झालं नाही. मंगळवारी उड्डाण झालं. सोलापूर आणि मराठवाडा परिसरात विमान फिरलं. या विमानाने जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमाभागात पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनीही पाऊस पडला असल्याचं सांगितलंय. अंबड तालुक्यातील कोडगाव, सुखापुरी, लखमापुरी, झिरपी आणि अंबड शहरात किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडल्याची माहिती आहे. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटे ते साडे पाचच्या दरम्यान हलक्या सरी कोसळल्या. सुखापुरी आणि लखमापुरी गाव परिसरात विमान पाहिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा

मराठवाड्याला सध्या नितांत पावसाची गरज आहे. यावर्षी मराठवाड्यात 50 टक्के सुद्धा पाऊस झालेला नाही.

  • औरंगाबाद 45 टक्के
  • जालना 39 टक्के
  • बीड 23 टक्के
  • लातूर 31 टक्के
  • उष्मानाबाद 30 टक्के
  • नांदेड 47 टक्के
  • हिंगोली 76 टक्के
  • परभणी 68 टक्के

मराठवाड्यात सरासरीच्या 50 टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाड्यातील धरणाची आजची स्थिती

  • जायकवाडी :- 90 टक्के
  • निम्न दुधना :- 0 टक्के
  • माजलगाव :- 0टक्के
  • येलदरी :- 0 टक्के
  • सिद्धेश्वर :- 0 टक्के
  • मांजरा  :- 0 टक्के
  • पैनगंगा  :- 0 टक्के
  • मनार :- 0 टक्के
  • निम्न तेरणा :- 0 टक्के
  • विष्णुपुरी :- 0 टक्के
  • सीना कोळेगाव :- 0 टक्के
  • शहागड बंधारा :- 0 टक्के
  • खडका बंधारा :- 6 टक्के

अत्यल्प पाऊस आणि धरणात शून्य टक्क्यांपेक्षाही अत्यंत कमी असलेला पाणीसाठा यामुळे मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. सध्या वातावरण ढगाळ आणि पावसाची थोडी थोडी भूरभूर असल्यामुळे दाहकता जाणवत नसली तरी पावसाने उघडीप दिल्यानंतर मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता सुरू होणार आहे. पण कृत्रिम पावसामुळे (Artificial rain aurangabad) ही दाहकता कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्याला कितप यश येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.