कुमार विश्वासांची शायरी काँग्रेसच्या जिव्हारी, तरी मंजू शर्मांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

राजस्थान सरकारने प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या पत्नीवर मोठी जबाबदारी टाकली आहे. मंजू शर्मा यांची राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.

कुमार विश्वासांची शायरी काँग्रेसच्या जिव्हारी, तरी मंजू शर्मांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 11:13 AM

जयपूर : राजस्थान सरकारने प्रसिद्ध कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्या पत्नीवर मोठी जबाबदारी टाकली आहे. मंजू शर्मा (Manju Sharma) यांची राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. (Ashok gehlot government Kumar Vishwas Wife Manju Sharma Rajasthan Public Service Commission)

बुधवारी राजस्थान सरकारने लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासह सदस्यांची नियुक्ती केली. यामध्ये कुमार विश्वास यांच्या पत्नीवर सरकारने ही मोठी जबाबदारी टाकली आहे.

कुमार विश्वास यांची पत्नी मंजू शर्मा राजस्थानच्या अजमेरच्या रहिवासी आहे. सिव्हील लाइन्स, अजमेर येथील रहिवासी मंजू शर्मा यांची 1994- 95 मध्ये हिंदीच्या प्राध्यापिका म्हणून नियुक्ती झाली. महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत असताना कुमार विश्वास यांच्याशी त्यांची भेट झाली. भेटीनंतर दोघांमध्ये खूप चांगली मैत्री जमली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

कुमार विश्वास यांची मुख्यमंत्री गेहलोतांशी वाढती जवळीक

राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कुमार विश्वास यांच्या पत्नीची नियुक्ती झाल्यापासून बर्‍याच चर्चांना सुरुवात झाली आहेत. कुमार विश्वास यांची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी जवळीक वाढत चालली आहे. तसंच कुमार विश्वास यांना अशोक गहलोत सरकारच्या 2019 च्या कला संस्कृती विभागाच्या कार्यक्रमातही आमंत्रित करण्यात आले होते, असाही धागा आता जोडला जात आहे.

कुमार विश्वासांची शायरी काँग्रेसच्या जिव्हारी, तरी मंजू शर्मांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

कवी कुमार विश्वास आपल्या कवितांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. डिसेंबर 2019 मध्ये राजस्थानातील जयपुरमध्ये झालेल्या कवी संमेलनामध्ये कुमार विश्वास यांनी राहुल गांधी यांच्यावर कवितेमधून जोरदार टोलेबाजी केली होती. ‘अधूरी जवानी का क्या फायदा, बिन कथानक कहानी का क्या फायदा, जिसमें धुलकर नजर भी ना पावन बनी, आंख में ऐसे पानी का क्या फायदा’, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. ही शायरी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. बरेच दिवस या शायरीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर ट्रेंड होता.

भूपेंद्र सिंह राजस्थान लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष

राजस्थान लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्या वास्तविक राजकीय हेतूने होत असतात म्हणूनच मंजू शर्मा यांच्या नियुक्तीनंतर अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. अशावेळी व्हीआरएस घेतलेल्या राजस्थानचे पोलीस महासंचालक डॉ. भूपेंद्र सिंह यांना राजस्थान लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे.

(Ashok gehlot government Kumar Vishwas Wife Manju Sharma Rajasthan Public Service Commission)

संबंधित बातम्या

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांची घराबाहेर लावलेली फॉर्च्युनर चोरीला

राजकीय टोलेबाजी! पवार, फडणवीस आणि कुमार विश्वास यांची शायरी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.