रुग्ण दगावल्याचा राग, नातेवाईकांकडून दोन दिवसांनंतर दवाखान्यावर दगडफेक

भावाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या समजातून दवाखान्यावर दगडफेक (attack on Hospital) केल्याचा प्रकार घडला आहे.

रुग्ण दगावल्याचा राग, नातेवाईकांकडून दोन दिवसांनंतर दवाखान्यावर दगडफेक
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 9:22 PM

कोल्हापूर : रुग्णाच्या मृत्यूला डॉक्टरच कारणीभूत असल्याच्या समजातून दवाखान्यावर दगडफेक (attack on Hospital) केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथे घडली. या हल्ल्यात दवाखान्याची तसेच चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आली. या बाबात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (attack on Hospital by relatives of dead patient)

मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथे अमीर हजारी यांचा दवाखाना आहे. त्यांच्याकडे माजी सरपंच मुबारक बारगीर यांनी उपचार घेतले होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांना कोरोनाची लगण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांनंतर त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना च्यांचा मृत्यू झाला.

त्यांनतर, मुबारक बारगीर यांच्या मृत्यूला अमीर हजारी हेच कारणीभूत असल्याचा बारगीर यांच्या नातेवाईकांचा समज झाला. बारगीर यांच्या मृत्यूनंतर पुढील दोन दिवस त्यांनी हजारी यांना दवाखाना उघडू दिला नाही. त्यानंतर रविवारी (29 नोव्हेंबर) हजारी यांनी दवाखाना ऊघडला. ते दवाखान्याची साफसफाई करत असल्याचे मृत मुबारक बारगीर यांच्या नातेवाईकांना समजले. हे समजताच हिम्मत महमद बारगीर, हसन महमद बारगीर, सरताज बारगीर आणि चंदू बारगीर या चौघांनी दवाखान्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत दवाखान्याचा दरवाजा फुटला. तसेच या चौघांनी अमीर हजारी यांच्या घरालादेखील लक्ष्य केले. त्यांच्या घरासमोरील गेटवर दगडफेक करुन या चौघांनी हजारी यांच्या घरासमोर असणाऱ्या दुचाकीची काचदेखील फोडली.

दरम्यान, हा गोंधळ सुरु असतानाच शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्यामुळे चारही हल्लेखोर पसार झाले. या घडनेबाबत शब्बीर जैनुल हजारी यांनी चारही नातेवाईंकाविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

ऑनलाईन लग्न जुळलं, पण नवरदेव आधीच विवाहीत, तरुणीला फसवणारा दीड वर्षानंतर गजाआड

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा

(attack on Hospital by relatives of dead patient)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.