AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ये दिवार आज तो जरुर टूटेगी! निरव मोदीचा बंगला स्फोट करुन पाडणार

रायगड:  पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीचं (of PNB scam ) हजारो कोटींचं कर्ज बुडवून, परदेशात फरार झालेला डायमंड किंग निरव मोदीचा (Nirav Modi bungalow)  अलिबागमधील आलिशान बंगला स्फोटक वापरुन पाडण्यात येत आहे. बंगल्याच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे. या बंगल्याचं बांधकाम इतकं मजबूत होतं की, ते पाडण्यासाठी चक्क बॉम्बचा वापर करावा लागत आहे. निरव मोदीच्या बंगल्यावर CRZ […]

ये दिवार आज तो जरुर टूटेगी! निरव मोदीचा बंगला स्फोट करुन पाडणार
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

रायगड:  पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीचं (of PNB scam ) हजारो कोटींचं कर्ज बुडवून, परदेशात फरार झालेला डायमंड किंग निरव मोदीचा (Nirav Modi bungalow)  अलिबागमधील आलिशान बंगला स्फोटक वापरुन पाडण्यात येत आहे. बंगल्याच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे. या बंगल्याचं बांधकाम इतकं मजबूत होतं की, ते पाडण्यासाठी चक्क बॉम्बचा वापर करावा लागत आहे.

निरव मोदीच्या बंगल्यावर CRZ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. नियंत्रित स्फोटाने हा बंगला पाडण्यात येणार आहे. दगडी बांधकाम असल्याने यापूर्वी बंगला पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. आज जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीने उतरले आहे.

प्रशासनाची डोकेदुखी

अनेक नियमांचं उल्लंघन करुन निरव मोदीने हा बंगला बांधला आहे. काही दिवसापूर्वी या बंगल्यावर कारवाई करण्यासाठी सुरुवात केली, पण त्यावेळी प्रशासनाची डोकेदुखी झाली. कारण, हे एवढं पक्कं बांधकाम आहे, की ते स्फोट करुन पाडलं जात आहे.

हायकोर्टाची स्फोटाला परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाने हा बंगला पाडण्यासाठी ब्लास्ट करण्याची परवानगी दिली आहे. निरव मोदी यांचा बंगला बेकायदेशीर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बंगल्याचं बांधकाम पक्कं असल्याने ते हतोड्याने तोडता येत नाही. हा बंगला सुरुंग लावून तोडण्याच्या परवानगीसाठी हायकोर्टात परवानगी मागण्यात आली होती. यावेळी ईडीने या बंगल्यात अनेक मौल्यवान वस्तू असल्याने त्या आम्हाला जप्त करायच्या आहे, यासाठी अर्ज केला होता.

कसा आहे हा आलिशान बंगला?

किहीम बीचपासून 50 मीटर अंतरावर निरव मोदीचा बंगला आहे. या बंगल्याच्या बाजूलाच काही अंतरावर अंबानी, रतन टाटा आणि विजय मल्ल्या यांचे बंगले आहेत. या अलिशान बंगल्यात पाच बेडरूम, हॉल, किचनचा समावेश आहे. त्यासोबत अडीच लाख लिटरचे दोन मोठे स्विमिंग पूल आहेत. बंगल्यात कोट्यवधी रूपयांचे फर्निचर, महागडे सोफे होते, जे ईडीने जप्त केले. त्यासोबत निजामकडून घेतलेला एक महागडा गालिचा, गाडीही जप्त करण्यात आली आहे. जवळपास दोन टन वजनाची धातूची ऐतिहासिक बुद्धमूर्ती अजूनही बंगल्यातच आहे. या मूर्तीचं काय करायचं यासंदर्भात प्रशासनाने कोर्टाला विचारणा केली. आता या मूर्तीसह सर्व वस्तूंचा लिलाव होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

निरव मोदीचा बंगला पडता पडेना

अलिबागमधील किहीम समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यावर तोडक कारवाईला सुरूवात झाली आहे. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून बंगला बांधल्याप्रकरणी 25 जानेवारीपासूनच प्रत्यक्षरित्या या कारवाईला सुरूवात झाली. पण, आजवर निरव मोदीच्या या बंगल्याचा एक कोपराही तोडण्यात प्रशासनाला यश आलेलं नव्हतं. मोठमोठी अवजारं, जेसीबी, पोकलेन आणि कामगारांचा मोठा फौजफाटा आणूनही ‘आखिर ये दिवारे टुँटती क्यो नही’ असा सवाल प्रशासनाला पडल्याचं दिसत होतं.

बंगला पडत का नव्हता?

निरव मोदीच्या या बंगल्याची प्रत्येक भिंत ही फक्त काँक्रिट घालून बनवण्यात आली. अशा या निरव मोदीच्या बंगल्याला पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून झाले. पण, बंगला मात्र जमीनदोस्त झाला नव्हता. तोडक कारवाई करत असताना अलिबाग प्रशासनावर पहिल्यांदाच अशी नामुष्की ओढावली. उपलब्ध साधनांमध्ये बंगला पाडता येणं शक्य नाही हे स्थानिक प्रशासनाला कळलं. म्हणूनच या मजबूत अशा बांधकामाला पाडण्यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेण्यात आली. जानेवारी अखेरीस लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठातील अभियंत्‍यांनी या बंगल्‍याची चार तास पाहणी केली. त्‍यांनी हे बांधकाम जेसीबीच्‍या सहाय्याने तोडण्‍याऐवजी नियंत्रित स्‍फोट पद्धतीचा अवलंब करावा, असा अभिप्राय दिला. त्‍यानुसार नियंत्रित स्‍फोटाने हे बांधकाम तोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

बांधकाम पाडण्‍यापूर्वी या बंगल्‍यातील झुंबरस न्‍हाणीघर किंवा शौचालयातील किंमती वस्‍तू, इतर साहित्‍य बाजूला करून त्‍याचा लिलाव केला जाणार आहे. त्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयाची परवानगी मागितली आहे. पण, सध्या तरी हा बंगला एकदाचा कधी पडणार आणि ओढवलेल्या नामुष्कीतून सुटका कधी होणार याचीच चिंता प्रशासनाला पडल्याचं चित्रं आहे.

संबंधित बातम्या

भैय्या, ये दिवार टुँटती क्यू नही? निरव मोदीचा बंगला ब्लास्ट करुन पाडणार!

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.