‘बागी 3’ची रेकॉर्डतोड कमाई, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…

कोरोना विषाणूचं सावट, होळीपूर्वीचा डल फेज आणि दहावी-बारावीच्या परिक्षांमुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत संभ्रम होता.

'बागी 3'ची रेकॉर्डतोड कमाई, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Baaghi-3 First Day Collection ) यांच्या ‘बागी 3’ हा सिनेमा या शुक्रवारी (6 मार्च) प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 17 कोटी 50 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

या सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई सिनेसमिक्षक (Baaghi-3 First Day Collection ) तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली. तर इतर देशांमध्येही ‘बागी 3’ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. ‘बागी 3’ची वर्ल्ड वाईड फर्स्ट डे कलेक्शन 7 कोटी 48 लाख रुपये इतकं आहे. या सिनेमात अभिनेता रितेश देशमुखही प्रमुख भूमिकेत आहे.

कोरोना विषाणूचं सावट, होळीपूर्वीचा डल फेज आणिदहावी-बारावीच्या परिक्षांमुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत संभ्रम होता. मात्र या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 17 कोटी 50 लाख रुपये कमावले.

हेही वाचा : कोरोनाचा बॉलिवूडला विळखा, आयफा सोहळा पुढे ढकलला, वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार?

टाइगर श्रॉफचा हा पांचवा सिनेमा आहे ज्याने डबल डिजिट कलेक्शने सुरुवात केली आहे. मल्टीप्लेक्सच्या तुलनेत या सिनेमाने सिंगल स्क्रीन्सवर जास्त कमाई केली. तसेच, ‘वॉर’ सिनेमानंतर ‘बागी 3’ हा टायगरचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला, अशी माहिती तरण आदर्श यांनी दिली.

टायगरच्या सिनेमांची कमाई

ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ सिनेमाने पहिल्यादिवशी 53 कोटी 35 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘बागी 2’ने पहिल्या दिवशी 25 कोटी 10 लाख रुपये कमावले होते. ‘बागी 3’ने पहिल्याच दिवशी 17 कोटी 50 लाख रुपये कमावले. तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर-2’ने पहिल्या दिवशी 12 कोटी 6 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘बागी’ची पहिल्या दिवसाची कमाई 11 कोटी 94 लाख रुपये इतकी होती.

2020 मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सिनेमांबाबत बोलायचं झालं. तर, ‘बागी 3’ (Baaghi-3 First Day Collection ) हा आतापर्यंतचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

संबंधित बातम्या : 

ईशा अंबानीच्या घरी होळी पार्टी, बॉलिवूड सेलिब्रिटींची धुळवड

हिंदू-मुस्लिम एकतेवर रितेश देशमुखचा टिक टॉक व्हिडीओ

विवाहित पुरुषावर प्रेम करु नका, नीना गुप्तांचा तरुणींना सल्ला

बाहुबलीतील ‘भल्लालदेव’ने 30 किलो वजन घटवलं, पाहा राणा दग्गुबतीचा डाएट प्लान

 

Published On - 7:27 pm, Sat, 7 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI