कामाचं अपयश झाकण्यासाठी वावड्या, नगरमध्ये कोणीही भाजपातून राष्ट्रवादीत जाणार नाही, पाचपुतेंचे तनपुरेंना प्रत्युत्तर

नगर जिल्ह्यातून भाजपमधलं कुणीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाही. तशी सुतराम शक्यता देखील नाही, अशा शब्दात भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना प्रत्युत्तर दिलं.

कामाचं अपयश झाकण्यासाठी वावड्या, नगरमध्ये कोणीही भाजपातून राष्ट्रवादीत जाणार नाही, पाचपुतेंचे तनपुरेंना प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 4:45 PM

अहमदनगर :  नगर जिल्ह्यातून भाजपमधलं कुणीही राष्ट्रवादीत जाणार नाही. स्वत: काही काम करायचं नाही आणि मग आपल्या कामाचं अपयश झाकण्यासाठी अशा वावड्या उठवायच्या, अशा शब्दात भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Babanrao Pachpute Answer Prajakt Tanpure)

अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा दावा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर बबनराव पाचपुते यांना विचारलं असता त्यांनी तनपुरेंचा दावा फेटाळून लावत नगर जिल्ह्यातून भाजपमधून कुणीही राष्ट्रवादीत जाणार नाही, असं सांगितलं.

“नगर जिल्ह्यातून भाजपमधलं कुणीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाही. तशी सुतराम शक्यता देखील नाही. आहेत तिथे आपापल्या जागी सगळे ठीक आहेत. आपल्या कामाचं अपयश झाकण्यासाठी काही नेत्यांना असे दावे करावे लागतात”, असा टोला पाचपुतेंनी प्रजक्त तनपुरे यांना लगावला.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पाचपुते यांनी भाष्य केलं. पाचपुते म्हणाले, “राजकारण आहे म्हटल्यावर राजकारणात अशा गोष्टी होत असतात. अशा गोष्टी फारशा मनावर घ्यायच्या नसतात”.

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात जिल्हा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यावर पाचपुतेंनी टीकास्त्र सोडलं. अशा प्रकारचे दौरे केवळ दिखाव्यासाठी असतात तसंच पक्षश्रेष्ठींना दाखवण्यासाठी असतात. मुश्रीफांच्या दौऱ्याने काय सिद्ध झालं?, असा सवाल पाचपुतेंनी यावेळी उपस्थित केला.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज फसवं आहे. शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकरी मदतीसाठी आक्रोश करतोय. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत तोकडी आहे, असं पाचपुते म्हणाले.

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक, मंत्री तनपुरेंचा दावा

अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला.राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास कोण-कोण उत्सुक आहेत त्यांचे नावे वेळ आल्यावर मी नक्की सांगेन, असंही तनपुरे म्हणाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातमी

राष्ट्रवादी प्रवेशासाठी नगरचे अनेक नेते इच्छुक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्याने खळबळ

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.