पुणे विभागात किराणा दुकानात सॅनिटायझर विक्रीला बंदी

| Updated on: May 30, 2020 | 11:57 PM

पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात किराणा दुकानात हॅण्ड सॅनिटायझरवर बंदी घालण्यात आली आहे.

पुणे विभागात किराणा दुकानात सॅनिटायझर विक्रीला बंदी
Follow us on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॅण्ड सॅनिटायझरला (Ban On The Sale Of Sanitizers In Grocery Stores) अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता हे सॅनिटायझर किराणा दुकान, जनरल स्टोअर्समध्ये विक्री करण्यास मनाई करण्यात (Ban On The Sale Of Sanitizers In Grocery Stores) आली आहे.

पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात हॅण्ड सॅनिटायझरवर बंदी घालण्यात आली आहे. दुकानांमध्ये सॅनिटायझरची विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अन्न-औषध प्रशासन विभागाचे विभागीय सहआयुक्त सुरेश पाटील यांनी याबाबत निर्देश दिले.

हॅण्ड सॅनिटायझर हे औषध या प्रकारात मोडत असल्याने खरेदीही मान्यताप्राप्त परवानाधारक दुकानातूनच करावी. खरेदी करताना पक्क बिल घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विक्री ही फक्त किरकोळ औषध विक्रेते, छोटे औषध परवानाधारक, शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांना करण्याचे निर्देश आहेत (Ban On The Sale Of Sanitizers In Grocery Stores).

पुणे विभागात कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजारांच्या पार

पुणे विभागात आतापर्यंत 4 हजार 799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पुणे विभागात एकूण 9 हजार 364 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 4 हजार 140 अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. पुणे विभागात आतापर्यंत कोरोनाबाधित 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 209 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत .

कालच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 383 ने वाढ झाली आहे. आज पुणे जिल्ह्यात 241, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 41, सांगली जिल्ह्यात 3 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 68 अशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Ban On The Sale Of Sanitizers In Grocery Stores

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,940 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 65 हजारांच्या पार

पुण्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विळखा, 33 पोलीस, तर पालिकेतील 60 कर्मचाऱ्यांना लागण

पुणे शहर ‘स्लम फ्री सिटी’ होणार, महापालिका झोपडपट्ट्या पाडून टुमदार घरं उभारणार

पुण्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार