बँकॉकमधील थरारक स्कायवॉकचा व्हिडीओ एकदा पाहाच!

बँकॉकमधील थरारक स्कायवॉकचा व्हिडीओ एकदा पाहाच!


थायलंड: बँकॉक हे शहर तिथल्या नाईट लाईफसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथल्या नाईटलाईफची जादू काही औरच असते. रोशनाईने सजलेले रस्ते, मोठ-मोठ्या इमारती, सुंदर समुद्रकिनारे आणि बरंच काही. बँकॉकमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पर्यटकांना आपल्याकडे आकर्षूण घेतात. तिथली झगमगती लाईफ, ट्रॅडिशनल थाई मसाज, शॉपिंग मॉल, स्ट्रीट फूड, मंदिरं वगैरे पर्यंटकांचं लक्ष वेधून घेतात. रात्री पाण्यातून प्रवास करताना या शहराला बघणे डोळ्यांचे पारणे फेडणारं ठरतं. त्यामुळे जास्तीत जास्त  पर्यटकांचा कल हा बँकॉककडे असतो. परदेशी ट्रीपला जायचं म्हटलं की, अनेकांची पहिली पसंती ही बँकॉक असते. म्हणूनच की काय बँकॉक हे शहर जगभरातील पर्यटकांकडून सर्वात जास्त भेट दिलं जाणारं शहर आहे. इथे दरवर्षी  दीड कोटी लोक फिरायला येतात.

आता बँकॉकच्या या पर्यटन यादीत आणखी एक ठिकाण जोडले गेले आहे, ते म्हणजे इथला पारदर्शी स्कायवॉक. या स्कायवॉकला महानखा ग्लास स्काय वॉक ( Mahanakhon Glass SkyWalk.) असं नाव दिलं आहे.

तुम्ही चीनच्या स्कायवॉकबाबत ऐकले असेलचं. बँकॉकचा हा स्कायवॉकही तसाचं आहे. हा स्कायवॉक चीन इतका भयानक नसला, तरी तुम्हाला यावर उभं राहिल्यावर अंतराळी असल्याचा अनुभव नक्की येईल.

हा स्काय वॉक थायलंडची सर्वात ऊंच इमारत असलेल्या किंग पॉवर महानखां इथे बनवण्यात आलं आहे. ही इमारत 1,030 फूट इतकी उंच आहे. या स्काय वॉकवरून संपूर्ण बँकॉक बघायला मिळतं. तसेच तुम्ही यावर उभं राहून एक थरारक आणि आश्चर्यचकीत करणारा अनुभव घेऊ शकता.

हा ग्लास स्कायवॉक बँकॉकमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाहा VIDEO :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI