घराच्या वादातून दोन महिलांवर प्राणघातक हल्ला, महिलांच्या गुप्तांगावर बॅटने मारहाण, बीड हादरले

पुरुष आणि महिलांनी अक्षरशः शेजारील महिलांच्या गुप्तांगावर बॅट, स्टंपने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

घराच्या वादातून दोन महिलांवर प्राणघातक हल्ला, महिलांच्या गुप्तांगावर बॅटने मारहाण, बीड हादरले

बीड : घराच्या वादातून शेजाऱ्यांनी दोन महिलांवर प्राण घातक हल्ला चढविला (Beed Attack On Women). पुरुष आणि महिलांनी अक्षरशः शेजारील महिलांच्या गुप्तांगावर बॅट आणि स्टंपने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मारहाण एवढी अमानुष होती की याचं चित्रीकरण करणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीने अक्षरशः हंबरडा फोडला (Beed Attack On Women).

ही घटना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुले नगरमध्ये काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल असून तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. तर मारकुट्या महिला मात्र फरार आहेत. सदर हल्ल्यात मोनाली पुजारी आणि सोनी कम्मानूर या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

शहरातील महात्मा फुले नगर येथे दोन महिलांना काल सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शेजारी असलेले तीन पुरुष आणि इतर महिलांनी अमानुष मारहाण केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही मारहाण प्लॉटच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे (Beed Attack On Women).

पीडित मोनाली पुजारी आणि सोनी कम्मानूर यांना काल सायंकाळी मारुती साळवे, शाम साळवे आणि शरद साळवे यांच्यासह त्यांच्या घरातील महिलांनी यांनी मारहाण केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेंनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महात्मा फुले नगरमध्ये आमच्या घराच्या शेजारी आमच्याच मालकीचा प्लॉट असून तो मारुती साळवे, शाम साळवे आणि शरद साळवे हे बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला वारंवार धमक्या देत असून काल त्यांनी मारहाण केली असे म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत.

या प्रकरणासंबंधी मुलाखतीविषयी विचारले असता या प्रकरणात आम्ही टीव्ही माध्यमांना बोलू शकत नाहीत, तसे वरिष्ठांचे आदेश असल्याचे शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिर्ला यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. घटना गंभीर असतांना पोलिसांनी केवळ पुरुषांना अटक केली असली तरी मारकुट्या महिला मात्र पोलीस तपासात फरार दाखविण्यात आले आहेत.

Beed Attack On Women

संबंधित बातम्या :

एटीएममधून लाखो रुपयांची चोरी, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, दोघांना हरियाणातून अटक

कल्याणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर ड्रग्ज माफियांचा प्राणघातक हल्ला, चौघांना अटक

Published On - 10:19 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI