भंडाऱ्यात जादूटोण्याच्या संशयावरुन चार जणांना अमानुष मारहाण, जिवंत जाळण्याचा प्रयत्न, धनंजय मुंडेंकडून चौकशीचे आदेश

जादूटोण्याच्या संशयातून चौघांना पेटविण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यात घडल्याची माहिती (Bhandara Superstition four People beaten 26 people arrested) मिळाली.

भंडाऱ्यात जादूटोण्याच्या संशयावरुन चार जणांना अमानुष मारहाण, जिवंत जाळण्याचा प्रयत्न, धनंजय मुंडेंकडून चौकशीचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 11:45 PM

भंडारा : जादूटोण्याच्या संशयावरुन चार लोकांना अमानुष मारहाण करत त्यांना जिवंत जाळल्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. मात्र फिल्मी स्टाईलप्रमाणे ऐनवेळी पोलीस पोहोचल्याने आणि त्याचवेळी पाऊस आल्याने या चारही लोकांचे प्राण वाचले. या प्रकरणी पोलिसांनी 26 जणांना अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. (Bhandara Superstition four People beaten 26 people arrested)

जादूटोण्याच्या संशयातून चौघांना पेटविण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यात घडल्याची माहिती मिळाली. अंधश्रद्धेच्या माध्यमातून हिंसा आणि शोषणाचे प्रकार आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत. या संदर्भात तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेची प्रकृती बरी होत नव्हती. अनेक डॉक्टरी उपाय करुनही तिला काहीही फायदा होत नव्हता. तिच्या अंगात भूत आल्याप्रमाणे ती वागत होती. त्याच अवस्थेत तिने गावातील इतर लोकांच्या घरी जाण्यास सुरुवात केली. तिच्या पाठोपाठ कुटुंबातील लोक आणि इतर गावकरी जात होते. ती ज्या लोकांच्या घरी गेली, त्या सर्व चारही लोकांना तुम्ही जादूटोणा करुन माझ्या पत्नीची तब्येत खराब केली असा आरोप करुन भांडण केले.

गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजापूर हमेशा या गावात रात्री दीड वाजेच्या सुमारास गावातील जवळपास 20-25 जणांच्या टोळीने चार लोकांना नग्न करून अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे ऐनवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या चारही लोकांच्या अंगावरील पेट्रोल पेटले नाही. (Bhandara Superstition four People beaten 26 people arrested)

त्याच वेळी पोलीस गावात पोहोचले. त्यांनी लोकांना पिटाळून लावले. कुंदन गौपले, ओम प्रकाश मेश्राम, मनोहर थोटे आणि कचरू राऊत या चौघांचा समावेश आहे. पोलिसांनी योग्य वेळेत घटनेवर पोहोचून या चार लोकांना सुरक्षित आपल्या गाडीत बसवले. त्यांना उपचारासाठी तुमसर येथे रुग्णालय दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक सह मोठ्या प्रमाणात पोलिस त्या गावात पोहोचून तपास सुरू केलेला आहे. गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. (Bhandara Superstition four People beaten 26 people arrested)

संबंधित बातम्या : 

आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवा, दोघा मुलांकडून आरोग्यसेविकेला मारहाण

बनावट चेकने सराफांना गंडा, नागपूरच्या बदमाशाकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Non Stop LIVE Update
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.