पुण्यात गुंगीचं औषध देऊन मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार

पुणे: गुंगीचं औषध देऊन मांत्रिकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्क्यादायक घटना पुण्यात उघड झाली आहे. इतकंच नाही तर मांत्रिकाने पीडितेची साडेतीन लाखांची फसवणूकही केली आहे.  याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शब्बीर युनूस शेख या मांत्रिकाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? पीडित महिला आपल्या आजारी पतीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:43 PM

पुणे: गुंगीचं औषध देऊन मांत्रिकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्क्यादायक घटना पुण्यात उघड झाली आहे. इतकंच नाही तर मांत्रिकाने पीडितेची साडेतीन लाखांची फसवणूकही केली आहे.  याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शब्बीर युनूस शेख या मांत्रिकाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित महिला आपल्या आजारी पतीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी भोंदू शब्बीर शेखकडे गेली होती. त्यावेळी उतारा टाकण्याच्या बहाण्यानं या लंपट बाबाने पीडितेला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर बलात्कार केला.  2015 – 16 या वर्षातील घटना असून, या प्रकरणी सोमवारी पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शारीरिक सबंधांशिवाय पतीची तब्येत सुधारणार नसल्याचं या भोंदूबाबाने सांगितलं. त्याचबरोबर कोणाला सांगितल्यास बदनामी करुन पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही महिलेने आपल्या तक्रारीत केला.

संबंधित महिला येरवडा परिसरात राहते. तीन वर्षांपूर्वी तिची या भोंदूबाबाशी पुणे स्टेशन परिसरात भेट झाली. या भोंदूने महिलेचा विश्वास संपादन करुन, आजारी पतीची माहिती मिळवली. तसंच पतीला बरं करण्यासाठी उपाय सांगितले. या उपायामध्ये त्याने घरी येऊन उतारा टाकून देतो, तसंच शारीरिक संबंध ठेवल्याशिवाय पती बरा होणार नाही, अशा थापा लगावल्या. त्यानंतर हा भोंदू महिलेच्या घरी जाऊन त्याने तिला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला. तसंच तिच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, संबंधित महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें