Corona Vaccine | सीरम इन्स्टिट्यूट आणि ICMR ची मोठी घोषणा, लवकरच कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Nov 12, 2020 | 7:56 PM

जगभरातून कोरोना लसीबाबत चांगल्या बातम्या समोर येत आहेत. आता भारतातूनही अशीच माहिती समोर येतेय.

Corona Vaccine | सीरम इन्स्टिट्यूट आणि ICMR ची मोठी घोषणा, लवकरच कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी

नवी दिल्ली : जगभरातून कोरोना लशीबाबत चांगल्या बातम्या समोर येत आहेत. आता भारतातूनही अशीच माहिती समोर येतेय. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटऑफ इंडिया (SII) आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) आज (12 नोव्हेंबर) कोविशील्‍ड (COVISHIELD) या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या आणि अंतिम चाचण्यांची घोषणा केलीय. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचंही सांगण्यात आलंय (Big announcement of Serum institute and ICMR third trial of Covishield vaccine to begin soon).

ICMR आणि सीरम अमेरिकेच्या नोवावॅक्सच्यावतीने ही लस विकसित करत आहेत. या दोन्ही संस्था कोवोवॅक्सच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि संशोधनासाठी देखील एकत्र काम करत आहेत. सीरम इन्स्टिट्यूट या चाचण्यांची प्रक्रिया राबवत आहे. कोविशील्‍ड वॅक्सीनच्या निर्मितीमधील क्‍लिनिकल ट्रायल साईटचं शुल्क आयसीएमआर भरत आहे. तर सीरम इन्स्टिट्यूट लशीचा इतर खर्च करत आहे.

कोरोना लस चाचणीसाठी 1600 स्वयंसेवकांची नोंद

सध्या ICMR आणि सीरम देशातील वेगवेगळ्या 15 केंद्रांवर 2-3 क्लिनिकल ट्रायल पूर्ण करत आहेत. तिसऱ्या चाचणीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत 1600 स्वयंसेवकांनी नोंदणी केलीय.

आयसीएमआरने म्हटलंय, “आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांमधून आलेल्या निष्कर्षांनी ही लस कोरोनावर उपचार करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो. भारतात आतापर्यंत वैद्यकीय चाचणी सर्वोत्तम ठरलेली लस केवळ कोविशील्‍ड हीच आहे.”

तिसऱ्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये आलेल्या निष्कर्षांनुसारच आयसीएमआरच्या मदतीने सीरम कोरोना लशीचं उत्पन्न सुरु करेल. भारतात आतापर्यंत कोणत्याही लसीला मंजूरी मिळालेली नाही. मात्र, तरीही सीरम इन्स्टिट्युटने 4 कोटी लशींचं उत्पादन केलंय. ‘कोविशिल्ड’ लस पुण्यातील सीरम संस्थेकडून ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या ‘एस्ट्राजेनेका’च्या (AstraZeneca) मास्टर सीडसोबत विकसित करण्यात आलंय. असं असलं तरी संबंधित 4 कोटी लसींचं उत्पन्न जागतिक पातळीवरील पुरवठ्यासाठी आहे की भारतासाठी यावर सीरमने कोणतंही व्यक्तव्य करण्यास नकार दिला.

दुसरीकडे नोवावॅक्स लसीच्या उत्पादनाबाबत सीरमने म्हटलं, “अमेरिकी कंपनीकडून लसीची मागणी आलीय. लवकरच त्यांना लस दिली जाईल. सध्या या लसीची चाचणी युके, ब्राझिल, दक्षिण आफ्रीका आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात होत आहे.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | संपूर्ण जगासाठी मोठी बातमी, अमेरिकेच्या फायजर कंपनीची लस चाचणीत 90 टक्के यशस्वी

‘भारत बायोटेक’ची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?

मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी, आरोग्य सेवकांना प्रथम प्राधान्य

संबंधित व्हिडीओ :

Big announcement of Serum institute and ICMR third trial of Covishield vaccine to begin soon

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI