Bigg Boss 14 Grand Premier : ‘राधे माँ’ची बिग बॉसमध्ये एन्ट्री, बिग बॉससाठी प्रार्थना

कोरोनामुळे या कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी वेगळ्या असणार आहेत. नेहमीप्रमाणे या क्रार्यक्रमाला सलमान खान होस्ट करत आहे

Bigg Boss 14 Grand Premier : 'राधे माँ'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री, बिग बॉससाठी प्रार्थना

मुंबई :देशातील सर्वात मोठा रियालिटी शो ‘बिग बॉस’ एकदा पुन्हा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहे (Bigg Boss 14 Grand Premier). यंदा शोमध्ये बरंच काही वेगळं असणार आहे. कोरोनामुळे या कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी वेगळ्या असणार आहेत. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाला सलमान खान होस्ट करत आहे. यावेळी कोरोनामुळे बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांना घरात एन्ट्रीपूर्वी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा ग्रॅण्ड प्रिमिअर आज होत आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक येणार यावरुन पडदा उठणार आहे (Bigg Boss 14 Grand Premier).

[svt-event title=”गायक राहुल वैद्यही यंदा बिस बॉसमध्ये ” date=”04/10/2020,12:52AM” class=”svt-cd-green” ] गायक-परफॉर्मर राहुल वैद्यनेही शोमध्येृ एन्ट्री घेतली. राहुलने सांगितलं की त्याला फिरायला खूप आवडतं. त्याशिवाय, जर मला बिग बॉसच्या घरात प्रेम मिळालं तर मी त्याचं स्वागत करेन, असंही त्याने सांगितलं. [/svt-event]

[svt-event title=”राधे माँची बिग बॉसमध्ये एन्ट्री, बिग बॉससाठी प्रार्थना” date=”04/10/2020,12:49AM” class=”svt-cd-green” ] राधे माँने बिग बॉसच्या घरी जाऊन बिग बॉससाठी प्रार्थना केली. त्यांनी घरात देवीचा जयजयकार केला. त्यांना घर अत्यंत आवडल्याचंही त्यांनी सांगितलं. सोबत त्या म्हणाल्या की जेव्हाही बिग बॉस त्यांना बोलवतील त्या पूर्ण मनाने जातील. [/svt-event]

[svt-event title=”जान कुमारही बिग बॉसच्या घरात” date=”04/10/2020,12:55AM” class=”svt-cd-green” ] प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने बिग बॉसच्या घरात गाणे गात एन्ट्री घेतली. त्याने कुमार सानूचं लोकप्रिय ‘सोचेंगे तुम्हें प्यार…’ हे गाणं गायलं. [/svt-event]

[svt-event title=”दिलखेच अदा, बिग बॉसमध्ये अभिनेत्री पवित्रा पुनियाची एन्ट्री” date=”04/10/2020,12:38AM” class=”svt-cd-green” ] बिग बॉसमध्ये अभिनेत्री पवित्रा पुनियाची एन्ट्री झाली आहे. तिने ग्रँड प्रिमिअरमध्ये डान्स परफॉर्मन्स दिला. तिने टिप टिप बरसा पानी या गाण्यावर डान्स केला. तसेच, जर कोणी माझं मन दुखवलं तर मी त्याचं डोकं फोडेन असा इशाराही तिने दिला[/svt-event]

[svt-event title=”गायिका सारा गुरपालची बिग बॉसमध्ये एन्ट्री” date=”04/10/2020,11:51PM” class=”svt-cd-green” ] पंजाबी गायिका सारा गुरपालनेही बिग बॉस 14 मध्ये एन्ट्री घेतली आहे. साराने सांगितलं की ती स्वत:वर खूप प्रेम करते. [/svt-event]

[svt-event title=”निशांतनंतर शहजाद देओलची एन्ट्री” date=”04/10/2020,11:45PM” class=”svt-cd-green” ] शहजाद देओलने निशांतनंतर घरात एन्ट्री घेतली. शोमध्ये सलमानने निशांत आणि शहजादला सोबतच इंट्रोड्यूस केलं. [/svt-event]

[svt-event title=”बिग बॉसच्या घरात निशांत मलकानीची एन्ट्री” date=”04/10/2020,11:26PM” class=”svt-cd-green” ] टीव्ही अभिनेता निशांत मलकानीची शोमध्ये एन्ट्री झाली आहे. त्याने सांगितलं की तो जिंकण्यासाठी काहीही करु शकतो. तसेच, तो खूप रागीट असल्याचंही त्याने सांगितलं. [/svt-event]

[svt-event title=”हिना खान ने कापले जास्मीनचे केस” date=”04/10/2020,11:1800PM” class=”svt-cd-green” ] जास्मीनेने बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच तिला अवघड अशा टास्कला सामोरं जावं लागलं. तिला सिद्घार्थ शुक्ला, हिना खान आणि गौरह खानने वेगवेगळे अवघड टास्क दिले. हिना खानने जास्मीनचे केस कापले [/svt-event]

[svt-event title=”ड्रामा क्वीन जास्मीनची बिग बॉसमध्ये एन्ट्री” date=”04/10/2020,11:00PM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री जास्मीन भसीनने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. पूर्ण हिम्मत आणि ताकदीने तिने शोमध्ये प्रवेश केल्याचं दिसतंय. प्रवेश करताना तिने सलमान खानला तिच्या गुणांबद्दल सांगितलं. तसेच तिने तिच्यातल्या सकारात्मक गोष्टींचीही माहिती दिली. विशेष प्रेक्षक म्हणून बसलेल्या हिना खान, सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खान यांनी जास्मीनची निवड केली. [/svt-event]

[svt-event title=”शहजाद देओलही बिग बॉस-14चा स्पर्धक बनला” date=”04/10/2020,10:54PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”रुबिना-अभिनवची सेटवर एन्ट्री” date=”04/10/2020,10:20PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”निक्की तंबोलीची धमाकेदार एन्ट्री” date=”03/10/2020,09:45PM” class=”svt-cd-green” ] एजाज खाननंतर दाक्षिणात्य अभिनेत्री निक्की तंबोलीनेही बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री घेतली. [/svt-event]

[svt-event title=”बिग बॉसच्या घरात पहिल्या सदस्याची एन्ट्री” date=”03/10/2020,09:40PM” class=”svt-cd-green” ] बिग बॉसच्या घरात पहिला सदस्य एजाज खानची एन्ट्री- सलमान खानने एजाजला गब्बर असं टोपण नावही दिलं आहे. [/svt-event]

Bigg Boss 14 Grand Premier

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14: फक्त सलमान खानच नाही तर सिद्धार्थ शुक्लाची फी वाचून व्हाल थक्क!

PHOTO | Bigg Boss 14 House Tour | पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या घरात रेस्टोरेंट, स्पा, थिएटर, मॉलचा समावेश!

Published On - 11:45 pm, Sat, 3 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI