Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’ने एजाजची मागणी फेटाळली, घराबाहेर काढण्याऐवजी कविताला केवळ ‘समज’!

एजाजला धक्काबुक्की केली होती. तर, कविताने नियमांचे उल्लंघन करत, हिंसा केल्याने तिला घराबाहेर करण्यात यावे, अशी मागणी एजाजने केली होती.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’ने एजाजची मागणी फेटाळली, घराबाहेर काढण्याऐवजी कविताला केवळ ‘समज’!

मुंबई :बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात ‘दिल तो पागल है दिल दीवाना है’ या गाण्याने नव्या दिवसाची सुरुवात झाली. कदाचित त्या गाण्याचा प्रभाव म्हणावा, की काही काळानंतर घरात अक्षरशः ‘पागलपणा’ची लाट आली. प्रत्येकजण एकमेकांशी भांडू लागला. एजाजशी कविताचे (Kavita Kaushik) कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणादरम्यान कविताने एजाजला धक्काबुक्की केली होती. तर, कविताने नियमांचे उल्लंघन करत, हिंसा केल्याने तिला घराबाहेर करण्यात यावे, अशी मागणी एजाजने केली होती. मात्र, एजाजची ही मागणी ‘बिग बॉस’ ने फेटाळली. कविताला केवळ समज देण्यात आली (Bigg Boss 4 Latest Update Kavita Kaushik gets warning from Bigg Boss).

एक वाद शमतो तोच कविताने पुन्हा एकदा नव्या वादाची नांदी सुरू केली. स्वयंपाकघरातील काउंटर स्वच्छ नसल्यामुळे कविता कौशिकने जास्मीनला बोल लगावले. यावरून सकाळी सकाळी जास्मीन आणि कविता यांच्यात भांडण सुरू झाले. कविता जास्मीनशी भांडताना पाहून अली तिच्या समर्थनार्थ पुढे आला. पुन्हा एकदा घरात जोरदार घमासान सुरू झाले.

(Bigg Boss 4 Latest Update Kavita Kaushik gets warning from Bigg Boss)

‘बिग बॉस’चा निर्णय

घरात झालेल्या हिंसेवरून बिग बॉसने स्पर्धकांची कानउघडणी केली. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना शारीरिक बळ न वापरण्याची सूचना दिली. ‘बिग बॉस’च्या म्हणण्यानुसार एजाज खानच्या कृतीवर कविताची प्रतिक्रिया होती. पण, जर घरातील लोकांना कविताने चूक केली असे वाटत असेल, तर अली गोनीने कर्णधार म्हणून कविताला शिक्षा करावी, असा निर्णय बिग बॉस देतात. मात्र अली, बिग बॉसप्रमाणेच कविताला केवळ समज देण्याचे ठरवतो. या निर्णयानंतरही एजाज आणि कविता यांच्यातील धूसफूस सुरूच आहे (Bigg Boss 4 Latest Update Kavita Kaushik gets warning from Bigg Boss).

कविता-एजाजची दुष्मनी

एजाज खान (Eijaz Khan) आणि कविता कौशिक (Kavita Kaushik) यांच्यातील मैत्री आता दुष्मनीत बदलली आहे. घरात कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला आहे. कविता आणि एजाज खान यांच्यात किचनमध्ये सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. एजाज कविताच्या जवळ जाऊन भांडू लागताच कविताने एजाजला सरळ ढकलेले आहे. कविताच्या या हिंसक खेळीमुळे ती घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

कविता-एजाज यांचे भांडण पाहून निक्की तंबोली आणि अली गोनी कविताला समजवण्यासाठी पुढे आले होते. कोणीही एकमेकाला धक्का मारणार नाही, असा आदेश कर्णधार अली गोनीने दिला होता. मात्र, संतापलेल्या कविताने, माझ्यासमोर जो कोणी येईल त्याला मी धक्का मारेन, असे म्हटले होते.

(Bigg Boss 4 Latest Update Kavita Kaushik gets warning from Bigg Boss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI