Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात राहुल वैद्य-जान सानू दरम्यान घमासान सुरूच!

‘कॅप्टनसी’ टास्क दरम्यान पुन्हा एकदा सगळ्या स्पर्धकांनी गायक राहुल वैद्यला निशाणा बनवले आहे.

Bigg Boss 14 | 'बिग बॉस 14'च्या घरात राहुल वैद्य-जान सानू दरम्यान घमासान सुरूच!

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. सध्या यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya), जान कुमार सानू (Jaan Sanu) आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. ‘कॅप्टनसी’ टास्क दरम्यान पुन्हा एकदा सगळ्या स्पर्धकांनी गायक राहुल वैद्यला निशाणा बनवले आहे.( Bigg Boss Latest Update Rahul Vaidya and jaan kumar sanu fight)

या आठवड्यात बिग बॉसने जनता मतदान बंद केले आहे. जान कुमार सानूला सगळ्यात कमी मते मिळत असल्याने हे मतदान बंद केल्याचे बोलले जाते आहे. बिग बॉसच्या इतर स्पर्धकांपैकी केवळ जान कुमार सानूला सगळ्यात कमी मते मिळत आहेत. तो या घरातून बाहेर जाऊ नये, म्हणून त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले जात आहे.

कविता करतेय समजूत घालण्याचा प्रयत्न!

वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून घरात आलेल्या कविता कौशिकला ‘कॅप्टन’ पदाची धुरा सोपवण्यात आली होती. घरात आल्यावर तिने स्पर्धकांना त्यांची कामे नीट समजावून सांगण्यास सुरुवात केली. यादरम्यान कविता आणि एजाजमध्ये वाद झालेले पाहायला मिळाले. परंतु, कविताने समजूत काढत हा वाद तिथेच मिटवला. तर, दुसरीकडे जान आणि राहुलचे वाद संपण्याचे नावच घेत नाहीयत. जान सानूच्या बोलण्यानी दुखावलेले राहुल त्याला तू मुलींसारखा वागतोस, असे म्हटल्यावर घरातील इतर स्पर्धकांनी राहुलवर टीका करण्यास सुरुवात केली.(Bigg Boss Latest Update Rahul Vaidya and jaan kumar sanu fight)

हेही वाचा : ‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा ‘बिग बॉस’ स्पर्धकाला इशारा!

जान सानूची वाद बिग बॉसला पडणार महागात!

या वादादरम्यान जानने केलीली वक्तव्य आता कार्यक्रमासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ‘बिग बॉस’च्या खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.

यानंतर त्याच्यावर टीका होत असून, मनसे नेते अमेय खोपकर आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेत, त्याला या घरातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक

(Bigg Boss Latest Update Rahul Vaidya and jaan kumar sanu fight)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI