जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक

शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी देखील आता जानला या स्पर्धेतून वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 12:01 PM

मुंबई : कलर्स वाहिनीवर (Colors TV) सुरू असलेले ‘बिग बॉस’चे 14वे पर्व (Bigg Boss 14) सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आले आहे. घरातील स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने (Jaan Sanu) ‘मला मराठीची चीड येते’, असे म्हणत ‘मराठी’ भाषेचा अपमान केला आहे. यानंतर आता सगळ्याच स्तरांतून त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी देखील आता जानला या स्पर्धेतून वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. (Shivsena MLA Pratap Sarnaik demnds Eliminate Jaan Kumar Sanu From Bigg Boss 14)

‘बिग बॉस’च्या 14व्या पर्वाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागांत त्यात सहभागी असलेली स्पर्धक दुसऱ्या प्रतिस्पर्ध्या सोबत मराठी भाषेत संवाद साधत असताना अत्यंत मुजोर, मराठी द्वेष्टा जान कुमार सानू नावाच्या प्रतिस्पर्ध्याने तिला तू मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल, असे सांगत अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडा ओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर, मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे. (Shivsena MLA Pratap Sarnaik demnds Eliminate Jaan Kumar Sanu From Bigg Boss 14)

हे ही वाचा :  ‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा ‘बिग बॉस’ स्पर्धकाला इशारा!

‘बिग बॉस’ या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्रीतील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीमुळे टीआरपी मिळतो, त्याचे चित्रीकरणही महाराष्ट्रातच होते आणि त्याच महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा अवमान, त्या मालिकेतला कोणीतरी टिनपाट जान कुमार सानू नावाचा स्पर्धक करत असेल तर, ते कदापि खपवून घेणार नाही, असा कडक इशारा प्रताप सरनाईकांनी दिला आहे.(Shivsena MLA Pratap Sarnaik demnds Eliminate Jaan Kumar Sanu From Bigg Boss 14)

सलमान खान ने स्पर्धकांना योग्य ती समज द्यावी!

‘बिग बॉस 14’चा होस्ट आणि बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान अत्यंत उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम सादर करत असतो. परंतु, जेव्हा जान सानू सारखी विकृत लोक मराठी भाषेचा अवमान करतात तेव्हा त्याला योग्य तो कानमंत्र देणे, हे सलमान खानचे कर्तव्य आहे. परंतु, एरव्ही वैयक्तिक जीवनात मराठी भाषेबद्दल आत्मियता आणि प्रेम असणारा सलमान यावेळी गप्प का बसला?, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण, सलमानने अशा स्पर्धकांना त्याच्या भाषेत समज द्यावी, असे आवाहन देखील आमदार प्रताप सरनाईकांनी अभिनेता सलमान खानला केले आहे.

काय आहे प्रकरण?

‘बिग बॉस’च्या खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.

(Shivsena MLA Pratap Sarnaik demnds Eliminate Jaan Kumar Sanu From Bigg Boss 14)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.