Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा

Bigg Boss Marathi - 2 : 'बिग बॉस मराठी-2' मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा

मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात वेगवेगळ्या धीटणीचे स्पर्धक प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. दुसऱ्या पर्वात अनेक ओळखीचे आणि प्रसिद्ध चेहरेही आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘देवयानी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे. सध्या शिवानी सुर्वे ही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे तिची […]

Nupur Chilkulwar

|

May 29, 2019 | 6:17 PM

मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात वेगवेगळ्या धीटणीचे स्पर्धक प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. दुसऱ्या पर्वात अनेक ओळखीचे आणि प्रसिद्ध चेहरेही आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘देवयानी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे. सध्या शिवानी सुर्वे ही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे तिची लाईफस्टाईल, तिचे स्टायलिश आउटफिट, अॅक्सेसरीज आणि शूज. या सर्वांमुळे फॅन्समध्ये तिची क्रेझ आहे.

अभिनेत्री म्हटलं की त्यांचे कपडे, दागिणे, चपला हे सर्व महागड्या डिझायनर्सने डिझाईन केलेलं असतात. त्यामुळे शिवानीचे हे चर्चेत असलेले शूजही एखाद्या बड्या डिझायनरने तयार केलेले असतील, असं अनेकांना वाटतं. मात्र, त्यामागे कुणी बडा डिझायनर नाही तर या शूजचा शिल्पकार एक दिव्यांग आहे. तुम्हाला हे ऐकूण नक्कीच धक्का बसला असेल. मात्र, शिवानीने हे  शूज एका दिव्यांग मुलाकडून तयार करवून घेतले आहेत.

दिव्यांगाकडून शूज डिझाईन करुन घेण्यामागे एक कारण आहे. या दिव्यांग मुलांना रोजगार मिळावा आणि त्यांची कला इतरांपर्यंत पोहोचावी म्हणून शिवानीने हे शूज त्यांच्याकडून बवनून घेतले. हे शूज ‘बिग बॉस’च्या घरात घालून ती या दिव्यांग मुलांच्या कलेचं प्रमोशन करत आहे, असं म्हणायला हरकत नाही.

‘आय केअर लर्निंग स्कूल’ ही दिव्यांग मुलांसाठी काम करते. ह्या संस्थेने दिव्यांग मुलांना रोजगार मिळवा यासाठी ‘फिट मी अप’ नावाचा कार्यक्रम सुरु केला. याअंतर्गत शिवानी या मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. शिवानीने उचलेलं हे पाऊल अनेकांची मनं जिंकत आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें