AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद, नितीश कुमार मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाचे किती मंत्री?

साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद या फॉर्म्युलाने बिहारच्या मंत्रिमंडळात चारही पक्षांचे चेहरे असण्याची चिन्हं आहेत

साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद, नितीश कुमार मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाचे किती मंत्री?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 16, 2020 | 2:12 PM
Share

पाटणा : जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जनादेश पाहता जेडीयूच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची चिन्हं आहेत. तर एनडीएतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या वाट्याला अधिक मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. (Bihar CM Nitish Kumar Ministry Formula)

बिहारमध्ये सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या एनडीएमध्ये भाजप आणि जेडीयू यांच्यासोबत हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) हे दोन पक्षही आहेत. चार मित्रपक्षांमध्ये मंत्रिपदांच्या वाटणीसाठी सूत्र निश्चित झाले आहे. साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद या फॉर्म्युलाने चारही पक्षांचे चेहरे मंत्रिमंडळात असतील. विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

भाजप नेते सुशील कुमार मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदावरुन गच्छंती झाली आहे. भाजपने तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्यास रेणू देवी यांचं नाव आघाडीवर आहे.

मंत्रिमंडळात किती मंत्री असणार?

243 सदस्यांच्या विधानसभेत संविधानिक प्रावधानानुसार 15 टक्के सदस्यांना मंत्रिपद देता येऊ शकते. त्यानुसार बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 36 मंत्री असतील. एनडीएनला विधानसभा निवडणुकीत 125 जागा मिळाल्या असून भाजपला सर्वाधिक म्हणजे 74 जागा आहेत. त्यापाठोपाठ जेडीयूला 43, तर हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी चार-चार जागा आहेत.

कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं?

साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जाते. त्यानुसार भाजपला सर्वाधिक म्हणजे 21 मंत्रिपदं मिळतील, तर जेडीयूच्या वाट्याला बारा मंत्रिपदं येण्याची चिन्हं आहेत. हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल. नितीश कुमार स्वतः मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार असल्याने जेडीयूतील अकरा नेत्यांना मंत्रिपदं मिळतील.

बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू कोट्यातील 14 मंत्री रिंगणात उतरले होते. त्यापैकी आठ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर सहा मंत्री विजयी झाले. नितीश सरकारमधील मंत्री असलेले बिजेंद्र यादव, श्रावणकुमार, बीमा भारती, नरेंद्र नारायण यादव, महेश्वर हजारी आणि मदन सहनी पुन्हा विधानसभेवर गेले. याशिवाय विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांनीही आपली जागा राखली. (Bihar CM Nitish Kumar Ministry Formula)

संबंधित बातम्या :

बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे 7-7 मंत्री, भाजपच्या खात्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस

(Bihar CM Nitish Kumar Ministry Formula)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...