BIHAR ELECTION 2020 | बिहारमधील एक्झिट पोलनंतर काँग्रेसमध्ये उत्साह, सोनिया गांधींकडून ‘या’ दोन नेत्यांना महत्वाची जबाबदारी

बिहार विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर आता बिहारमधील राजकीय हालचाली वाढायला सुरुवात झाली आहे. याच हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांना बिहारचे पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे.

BIHAR ELECTION 2020 | बिहारमधील एक्झिट पोलनंतर काँग्रेसमध्ये उत्साह, सोनिया गांधींकडून 'या' दोन नेत्यांना महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar assembly election 2020)शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये (Bihar exit poll) राष्ट्रीय जनता दल (RJD)आणि काँग्रेसला (congress) मोठा दिलासा मिळाला आहे. जनमत चाचण्या समोर आल्यानंतर काँग्रेसमध्येही उत्साह संचारला आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये पुढील तयारीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेसकडून या दोघांना बिहारचा पर्यवेक्षक नेमण्यात आलं आहे. (Sonia Gandhi appoints Randeep Surjewala and Avinash Pandey as supervisors after bihar elections Exit polls)

बिहार विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर आता बिहारमधील राजकीय हालचाली वाढायला सुरुवात झाली आहे. याच हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांना बिहारचे पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे. बिहारसंदर्भात कांग्रेसचे सर्व निर्णय आता हे दोन नेते घेणार आहेत. तसंच संपूर्ण परिस्थितीची माहिती पक्षाध्यक्षांना देणं ही जबाबदारीही या दोन नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

बिहार विधानसभा एक्झिट पोल

निवडणुकीत NDA ला फटका बसण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे, तर यूपीए-महागठबंधन झेप घेण्याचे संकेत मिळत आहेत. Tv9 च्या महाएक्झिट पोलनुसार (TV9 Maha Exit Poll) भाजप-जदयू यांच्या ‘एनडीए’ला 110 ते 120 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर राजद आणि काँग्रेस यांचं महागठबंधन 115 ते 125 जागा जिंकण्याचे संकेत आहेत.

बिहार विधानसभा निकालाबाबत अन्य एक्झिट पोल

ABP न्यूज -सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 104 ते 128

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 108 ते 131

 

रिपब्लिक टीव्ही- जनकी बातचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 91 ते 117

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 136 ते 138

 

टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 116

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120

लोजप – 1

अन्य – 6

संबंधित बातम्या:

Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती

Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमार यांना झटका, 63 टक्कांकडून सत्ता बदलाला पसंती

Bihar Exit Poll: ‘तेजस्वी’ लाटेचा चिराग पासवान यांनाही मोठा फटका; ‘किंगमेकर’ का होऊ शकले नाहीत?; पाहा एक्झिट पोलचे आकडे

Sonia Gandhi appoints Randeep Surjewala and Avinash Pandey as supervisors after bihar elections Exit polls

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI