या तर चोराच्या उलट्या बोंबा, झोपू योजनेवरुन भाजपची शिवसेनेवर टीका

या तर चोराच्या उलट्या बोंबा, झोपू योजनेवरुन भाजपची शिवसेनेवर टीका
Atul Bhatkhalkar

मुळातच दहा वर्षाच्या आत खरेदी-विक्री केलेल्या लोकांना संरक्षण देण्याचा कायदा हा देवेंद्र फडणवीस सरकारने केला | SRA scheme

Rohit Dhamnaskar

|

Feb 18, 2021 | 3:03 PM

मुंबई: झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातल्या (SRA) सदनिकाधारकांना घराच्या बाहेर काढण्याच्या विरोधामध्ये शिवसेनेने आणि इमारत दुरुस्ती महामंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी भूमिका घेणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशी जोरदार टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (BJP leader Atul Bhatkhalkar slams Shivsena over SRA Scheme)

मुळातच दहा वर्षाच्या आत खरेदी-विक्री केलेल्या लोकांना संरक्षण देण्याचा कायदा हा देवेंद्र फडणवीस सरकारने केला, त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यावेळच्या महाधिवक्ता यांनी हा कायदा वैध ठरवला. आता ठाकरे सरकारला गेल्या वर्षभरामध्ये फक्त न्यायालयामध्ये यासंदर्भातली बाजू मांडायची होती. परंतु एवढे काम सुद्धा ठाकरे सरकारने केले नाही, त्यामुळे ठाकरे सरकारला या लोकांना संरक्षण देण्यामध्ये रस नाही हे स्पष्ट होते. काल भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तेव्हा या संदर्भातल्या गोष्टीची गंधवार्ताही मान. मुख्यमंत्र्यांना नव्हती अशीही टीका सुद्धा आ. भातखळकर यांनी केली आहे.

त्यामुळे शिवसेनेने निवेदन देणे आणि मागणी करणे असली नाटकबाजी बंद करावी आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातल्या सदनिकाधारकांना संरक्षण देण्याकरिता गाढ झोपेत असलेल्या ठाकरे सरकारला जागे करून उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास किंवा आजच्या आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यास सांगावे अशी मागणी आ. भातखळकर यांनी केली आहे.

आधीच्या सरकारचं चांगलं काम साधं पुढे नेण्याचं सुद्धा सदबुद्धी आणि नीतिमत्ता या सरकारकडे नाही याच्या उलट फक्त कांगावा करणे, आम्हीच तारणार आहोत, खोटा दावा करणे हे शिवसेनेचे उद्योग चालू आहेत परंतु याच्यामुळे एस. आर. ए. तील सदनिकाधारक फसणार नाहीत अशीही टीका आ. भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई भारतीय जनता पार्टी एकाही सदनिकाधारकांना घरातून बाहेर काढू देणार नाही. यासंदर्भात ज्यांना कोणाला नोटिसा आल्या असतील त्यांनी आपापल्या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींशी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, भारतीय जनता पार्टी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे आवाहन सुद्धा आ. भातखळकर यांनी केले आहे.

(BJP leader Atul Bhatkhalkar slams Shivsena over SRA Scheme)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें