BREAKING : देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात, दोघेही सुखरूप

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला (Devendra Fadnavis-Pravin Darekar Car Accident Near Jalgaon) आहे.

BREAKING : देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात, दोघेही सुखरूप
देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 11:36 PM

जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने हे दोन्ही नेते सुखरुप आहेत.  दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या घरी जाताना हा अपघात झाला. (Devendra Fadnavis-Pravin Darekar Car Accident Near Jalgaon)

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या जळगावच्या घरी जात होते. त्याचवेळी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने त्यांची गाडी समोरच्या गाडीवर आदळली. त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

“नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला. स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तर त्यापाठोपाठ प्रवीण दरेकर यांनी “काळजी नसावी! मी आणि सर्व सहकारी सुखरूप आहोत,” असे ट्विट केले आहे.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर विविध महापालिकांना भेट देत कोरोनाची परिस्थिती जाणून घेत आहेत. आज त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज कोविड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली.

“चाचण्या न झाल्याने प्रारंभीच्या काळात झालेल्या मृत्यूंची नोंद ही कोरोनाबळी म्हणून झालेली नाही. पण, आता त्यात मागे जाऊन काहीही करता येणार नाही. दरवर्षीच्या तुलनेत तीन ते चार पट मृत्यू यावर्षी मालेगावांत अधिक झाले. येणार्‍या काळात मोठ्या प्रमाणात चाचण्यांची गरज आहे,” असे फडणवीस यावेळी म्हणाले. (Devendra Fadnavis-Pravin Darekar Car Accident Near Jalgaon)

“महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कोरोनामुळे उदभवलेली स्थिती आणि त्यावर केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. मालेगावमध्ये सुरूवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यावेळी चाचण्यांची संख्या सुद्धा अतिशय कमी होती. आता परिस्थिती सुधारते आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Devendra Fadnavis-Pravin Darekar Car Accident Near Jalgaon)

संबंधित बातम्या : 

‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने, कधी राज्यपालांच्या : देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.