बळीराजा चेतना अभियानात 6 कोटी 25 लाखांचा घोटाळा : भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर

बळीराजा चेतना अभियानात उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी 6 कोटी 25 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर (BJP MLA Sujitsingh Thakur) यांनी केला आहे.

बळीराजा चेतना अभियानात 6 कोटी 25 लाखांचा घोटाळा : भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर

उस्मानाबाद : बळीराजा चेतना अभियानात उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी 6 कोटी 25 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर (BJP MLA Sujitsingh Thakur) यांनी केला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

सुजितसिंह ठाकूर यांच्या आरोपावर बळीराजा चेतना अभियानातील अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समजू शकलेली नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यलयातील अधिकारी घोटाळ्याच्या या आरोपावर काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे हा सर्वप्रकार जवळपास 1 वर्षांपूर्वीचा आहे. ठाकूर यांनी आपल्या पक्षाचं सरकार असताना या प्रकारावर प्रश्न उपस्थित का केले नाहीत, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बळीराजा चेतना अभियान घोटाळ्यातील नेमके आरोप काय?

फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान हा प्रकल्प राबवला गेला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती.  या योजनेअंतर्गत कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे, यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि पुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या योजनेसाठी 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी 7 कोटी 19 लाख रुपये जिल्हा कृषी अधीक्षक ‘आत्मा विभागा’कडे (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) वर्ग करण्यात आले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी ‘आत्मा विभाग’ ही योजना राबवण्यास उत्सूक नसल्याचं दाखवत ही योजना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंमलबजावणीसाठी निधीसह वर्ग केला.

आत्मा विभागाने ही योजना राबवण्यासाठी सक्षम नसल्याचे कळवल्यानंतर हा उपक्रम प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांच्यामार्फत राबवण्याचे सुधारित आदेश 16 फेब्रुवारी 2019 रोजी देण्यात आले. त्यानुसार शेतकरी प्रशिक्षणाचे काम प्रकल्प संचालक आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत करण्यात आलं. ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांच्यामार्फत राबवण्यात आला. त्यानंतर हा निधी 31 मार्च 2019 पूर्वी खर्च करुन निधी विनियोगअंती उपयोगिता प्रमाणपत्र कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 102 प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. त्यात 7 हजार 12 शेतकऱ्यांचा सहभाग दाखवत 94 लाख खर्च करण्यात आले आणि उर्वरित 6 कोटी 25 लाख जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांच्याकडे 28 फेब्रुवारी 2019 रोजी वर्ग करण्यात आले. यात केवळ दीड महिन्यापेक्षा कमी कालावधीत निधीची विल्हेवाट लावल्याचा आरोप ठाकूर (BJP MLA Sujitsingh Thakur) यांनी केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे आणि पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमांचे जिओ टॅगिंगसह व्हिडीओ शूटिंग करण्याच्या सूचना होत्या. याशिवाय शेतकरी प्रशिक्षणानंतर काही शेतकऱ्यांच्या यशोगाथाचे व्हिडीओक्लिप तयार करण्यात येणार होते. मात्र तसे झाले नाही. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यशोगाथा अद्याप उजेडात आल्या नाहीत. बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत 6 कोटी 25 लाख रुपयांच्या पुस्तक खरेदीची प्रक्रिया टेंडरशिवाय झाली असून योजनेच्या अंमलबजावणीची संचिकाही गायब आहे, असा दावा करत या योजनेच्या चौकशीची आणि दोषींवर गुन्हे नोंद करण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.

आणखी बातम्या :

उद्धव ठाकरेंना थंडी वाजत होती का?, नारायण राणेंचा प्रहार

सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस पुन्हा चर्चेत, फडणवीसांसोबत फोटो, लूक हू आय मेट टुडे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI