सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस पुन्हा चर्चेत, फडणवीसांसोबत फोटो, लूक हू आय मेट टुडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉटसअॅप स्टेटस (Supriya Sule whatsapp status) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस पुन्हा चर्चेत, फडणवीसांसोबत फोटो, लूक हू आय मेट टुडे

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉटसअॅप स्टेटस (Supriya Sule whatsapp status) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सुप्रिया सुळेंनी व्हॉटसअॅप स्टेटसला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो ठेवला आहे. फडणवीसांच्या पाठीवर हात ठेऊन झालेल्या हास्यविनोदाला सुप्रिया सुळेंनी कमेंट केली. लूक हू आय मेट टुडे? असं स्टेटस लिहिलं आहे. (Supriya Sule whatsapp status)

सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे बुधवारी विधानभवनात आल्या होत्या. वळसे पाटील यांची भेट आटोपून त्या परत निघाल्या असता, त्यांच्यासमवेत काही इतर महिला पदाधिकारीही होत्या. तेवढ्यात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुरक्षारक्षक आले आणि समोरुन येणाऱ्या महिलांना बाजूला सरा, बाजूला सरा करीत त्यांनी फडणवीस यांना तेथून जाण्यासाठी जागा केली.

त्याकडे सुप्रिया सुळे यांचे लक्ष गेले आणि त्यांनी सुरक्षारक्षकांना प्रथम हटकले, मग खुद्द फडणवीस यांना “देवेंद्रजी..तुमचे सुरक्षारक्षक महिलांना अशा पध्दतीने बाजूला सारून पुढे निघालेत, हे योग्य आहे का?” असा प्रश्न केला.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने “ते बहुधा नवीन आहेत. त्यांना सांगावेच लागेल, असे करू नका” असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर होकारार्थी उत्तर दिले, पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मग पाच वर्षात काय केलं? असा प्रश्न केला आणि एकच हशा पिकला.

त्यादरम्यान उपस्थितांनी हा फोटो काढला होता. मग हा फोटो सुप्रिया सुळेंनी आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसला ठेवत, त्याखाली लिहिलं, लूक हू आय मेट टुडे!.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून त्या कमेंटची लागलीच चर्चा झाली.नेटकऱ्यांनी मग या विषयावर आपापल्या बाजूने खिंड लढवत त्यावर कमेंट पास केल्या.मात्र ही छायाचित्राची आतली खरी बातमी अनेकांना समजलीच नव्हती…! राजकीय क्षेत्रात आल्यापासून खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच महिलांबद्दल संवेदनशील असल्याचं पाहायला मिळालं. कालच्या विधानभवनातील प्रसंगातही त्यांची महिलांबद्दल असलेली संवेदनशीलता अनुभवायला मिळाली.

Published On - 6:51 pm, Thu, 27 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI