‘खासगी कामासाठी सरकारी खर्चाने विमानप्रवास करणाऱ्या नितीन राऊतांना मंत्रिमंडळातून काढा’

ऊर्जामंत्री राऊत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवीत हा विमान प्रवास केला.| Nitin Raut

'खासगी कामासाठी सरकारी खर्चाने विमानप्रवास करणाऱ्या नितीन राऊतांना मंत्रिमंडळातून काढा'
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विश्वास पाठक यांनी नितीन राऊत यांना लक्ष्य केले.
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 4:41 PM

मुंबई: ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत लॉकडाऊन काळात बेकायदा पद्धतीने खासगी कामासाठी विमान प्रवास केल्याचे उघड झाले असल्याने मुख्यमंत्र्यांनी राऊत (Nitin Raut) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते विश्वास पाठक यांनी केली. सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 406,409 अन्वये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावी अशी मागणी करणारा अर्ज आपण वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्याचेही पाठक यांनी सांगितले. (BJP take a dig at congress minister nitin raut)

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विश्वास पाठक यांनी नितीन राऊत यांना लक्ष्य केले. लॉकडाऊन काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई – नागपूर, 9 जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर , दिल्ली असा विमान प्रवास केल्याचे माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीत ‘महानिर्मिती’ने मान्य केले आहे. हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशा पद्धतीने खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसाचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरण ला आपल्या मंत्र्याच्या खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाचा खर्च करण्यासाठी मात्र पैसा आहे, हे आश्चर्यजनक आहे.

ऊर्जामंत्री राऊत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवीत हा विमान प्रवास केला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना तातडीने मंत्रिमंडळातून हटवावे अशी मागणी पाठक यांनी केली. यावेळी पाठक यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील देणारी कागदपत्रे व राऊत यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रत सादर केली.

(BJP take a dig at congress minister nitin raut)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.