AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा

रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्याचा आरोप आहे (BJP Vidhan Parishad MLC Ramesh Karad FIR)

विधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा
| Updated on: May 22, 2020 | 9:27 AM
Share

बीड : विधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये गोपीनाथ गडावर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड यांच्यासह 22 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (BJP Vidhan Parishad MLC Ramesh Karad FIR)

भाजप आमदार रमेश कराड यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारुन जमाव करत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पंकजाताईंनी अभ्यास केला, कराडांना उमेदवारी मिळवून दिली, मला जमलं नाही : राम शिंदे

यावेळी कराड यांच्यासमवेत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड आणि 15 जण होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचे आणि प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

हेही वाचा : भाजपचा ‘डमी’वर शिक्का, ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला, पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकला उमेदवारी!

भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला होता. भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र अचानक त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेल्या रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली. शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. (BJP Vidhan Parishad MLC Ramesh Karad FIR)

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असल्याचं सांगण्यात येतं. कराड यांनी दोन वर्षापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीत मोठी खेळी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधानपरिषदेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांची मोठी अडचण झाली होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीकडे उमेदवारच न उरल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती.

2018 मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातून विधानपरिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी भाजपच्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता.

विधानसभा निवडणुकीला निराशा

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही रमेश कराड यांची निराशा झाली होती. शिवसेना-भाजप युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे रमेश आप्पा कराड यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होती. कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा सूर आवळल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं रमेश कराड यांनी जाहीर केलं होतं.

संबंधित बातम्या 

मतदारसंघ शिवसेनेला सुटला, रमेश कराड यांची पुन्हा निराशा

रमेश कराड यांच्यावर अखेर बंडखोरीची वेळ, अपक्ष अर्ज भरणार

(BJP Vidhan Parishad MLC Ramesh Karad FIR)

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.