रमेश कराड यांच्यावर अखेर बंडखोरीची वेळ, अपक्ष अर्ज भरणार

रमेश आप्पा कराड (Ramesh Karad latur rural) यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा सूर आवळल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं रमेश कराड यांनी जाहीर केलं.

रमेश कराड यांच्यावर अखेर बंडखोरीची वेळ, अपक्ष अर्ज भरणार
Follow us
| Updated on: Oct 03, 2019 | 7:13 PM

लातूर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते रमेश कराड (Ramesh Karad latur rural) यांनी बंड करण्याची तयारी केली आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. त्यामुळे रमेश आप्पा कराड (Ramesh Karad latur rural) यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा सूर आवळल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं रमेश कराड यांनी जाहीर केलं.

संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर रमेश आप्पा कराड यांनी ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतला. यात कार्यकर्त्यांनी अपक्ष लढावं असा सूर लावला. भाजपाचे कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला.

रमेश कराड शुक्रवारी म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज भरतील. गेल्या तीन वर्षांपासून रमेश कराड भाजपाचे एकमेव इच्छुक उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी करत होते. या अगोदरच्या दोन निवडणुका रमेश कराड यांनी भाजपाच्या उमेदवारीवर लढल्या, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडून यायचा निर्धार त्यांनी केला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. इथे सचिन देशमुख हे नवखे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेपेक्षा जास्त पटीने भाजपाची ताकद आहे. रमेश कराड यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास त्यांची काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्याशी लढत असणार आहे.

वाचा – मतदारसंघ शिवसेनेला सुटला, रमेश कराड यांची पुन्हा निराशा

लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना जोरदार विरोध होतोय. कारण, अभिमन्यू पवार यांच्यासाठी शिवसेनेकडून औसा हा मतदारसंघ घेण्यात आला आणि त्याबदल्यात भाजपला लातूर ग्रामीण मतदारसंघ देण्यात आलाय. यामुळे रमेश कराड यांची निराशा झाली आहे.

रमेश कराड यांनी यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीत बंड केलं होतं. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारीही जाहीर झाली. मात्र पंकजा मुंडे यांनी आश्चर्यकारकरित्या रमेश कराड यांना पुन्हा भाजपात आणलं आणि राष्ट्रवादीवर मात केली. रमेश कराड हे विधानसभेची तयारी करत होते. पण शिवसेनेला मतदारसंघ सुटल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.