सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला

सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या बातमीने अंकिता लोखंडेला जबरदस्त धक्का बसला. (Ankita Lokhande Reacts Sushant Singh Rajput Suicide)

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. काही वर्षांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप झाला. सुशांत सोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता मानसिक नैराश्येत गेली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीने अंकिता निशब्द झाली. तिला जबरदस्त धक्का बसला. (Ankita Lokhande Reacts Sushant Singh Rajput Suicide)

काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता लोखंडेला सुशांत सिंहच्या आत्महत्येची माहिती एका फोनद्वारे मिळाली. ज्या क्षणी तिला सुशांतने आत्महत्या केल्याचे समजले, तेव्हा ती जोरात फक्त ‘काय’ म्हणून ओरडली आणि दुसऱ्या क्षणात तिने फोन ठेवला.

View this post on Instagram

Receive without pride, let go without attachment. #Meditations

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

सुशांत सिंह आणि अंकिता लोखंडे या दोघांनी छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केले. या दरम्यान ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबूली दिली. रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा ब्रेकअप झाला.

ब्रेकअपनंतर सुशांतने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले. मात्र अंकिता लोखंडेला या ब्रेकअपचा जबर झटका बसला. ती कित्येक दिवस कोणाशीही बोलत नव्हती. काही कालावधीनंतर तिने स्वत:ला सावरले. त्यानंतर तिनेही कामात लक्ष केंद्रीत केले. मात्र अचानक आता सुशांतच्या आत्महत्येची बातमी मिळताच तिला धक्का बसला.  (Ankita Lokhande Reacts Sushant Singh Rajput Suicide)

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट

Sushant Singh Rajput | अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का.. संजय राऊत-उद्धव ठाकरेही हळहळले

Published On - 5:27 pm, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI