Salman Khan | सलमानच्या ड्रायव्हरला कोरोना, भाईजान आयसोलेट

सलमानच्या ड्रायव्हरसह दोघ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत मात्र, सुदैवाने सलमानला सध्या कोरोनाची लागण झालेली नाही.

Salman Khan | सलमानच्या ड्रायव्हरला कोरोना, भाईजान आयसोलेट
www.hdnicewallpapers.com

मुंबई : बॉलिवूडचा सुलतान सलमान खानने स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे (Salman Khan Isolate Himself). त्यामुळे सलमानला कोरोना झाला की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या दोन स्टाफ मेंबर्सना कोरोना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सलमाननेही स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे (Salman Khan Isolate Himself).

माहितीनुसार, सलमानच्या ड्रायव्हरसह दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत मात्र, सुदैवाने सलमानला सध्या कोरोनाची लागण झालेली नाही. तरीही त्याने खबरदारी म्हणून स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे. त्याच्या आयसोलेट होण्याने त्याच्या कामावरही मोठा परिणाम होणार आहे. कारण, यावेळी सलमान खानच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तसेच, तो बिग बॉस-14 या कार्यक्रमाचं होस्टिंगही करतो आहे. त्यामुळे यासर्वांमुळे त्याच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सलमान खानने स्वत: सांगितलं होतं की तो कोरोना व्हायरसमुळे अत्यंत भयभीत झाला आहे. त्याला ही भीती स्वत:साठी नाही तर त्याच्या कुटुंबासाठी वाटत आहे जे त्याच्यासोबत राहतात, खासकरुन लहान मुलं आणि वृद्ध. त्यामुळे तो सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत होता.

लॉकडाऊनंतर सिनेमे आणि मालिकांचं शूटिंग पुन्हा एकदा सुरु झालं आहे. अशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही अनेक कलाकारांना कोरोनाने ग्रासलं आहे.

Salman Khan Isolate Himself

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | ‘कर्णधार’पदासाठी जबरदस्त खेळी, राहुल वैद्य-रुबिना दिलैकमध्ये चुरशीचा सामना!

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’ने एजाजची मागणी फेटाळली, घराबाहेर काढण्याऐवजी कविताला केवळ ‘समज’!

Bigg Boss 14 | कविता कौशिकचा एजाजला धक्का, हिंसक वर्तनामुळे घराबाहेर जाणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI