Domestic Voilence | ‘वेळीच बोलत्या व्हा!’, महिलांवरील अत्याचार विरोधात एकवटल्या बॉलिवूड अभिनेत्री

कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यादरम्यान सर्वेक्षणानुसार जगभरात लॉकडाऊन दरम्यान घरगुती हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.

Domestic Voilence | ‘वेळीच बोलत्या व्हा!’, महिलांवरील अत्याचार विरोधात एकवटल्या बॉलिवूड अभिनेत्री
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 1:49 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यादरम्यान सर्वेक्षणानुसार जगभरात लॉकडाऊन दरम्यान घरगुती हिंसाचाराच्या (domestic violence) सर्वाधिक घटना घडल्या आहेत. महिलांवरील हिंसाचाराच्या निर्मूलनासाठी असलेल्या या आंतरराष्ट्रीय दिनाच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. जगभरात महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना रोखणे आणि दूर करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी यावेळी सगळ्या बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actresses) एकवटल्या आहेत (Bollywood Actresses stand against domestic violence).

दरवर्षीप्रमाणे, 25 नोव्हेंबर पासून ही 16 दिवसीय मोहीम सुरू केली गेली आहे. 10 डिसेंबर रोजीही मोहीम संपणार आहे.  हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हिंसा थांबविण्यासाठी आणि या घटनांतून बचावलेल्यांना मदत करण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

महिलांनी लढा दिला पाहिजे…

घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी क्रिती सेनॉन, ऐश्वर्या राय बच्चन, आदिती राव हैदरी यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेत्री पुढे आल्या आहेत. ऐश्वर्या राय बच्चनने हातावर डी अक्षर लिहून एक फोटो शेअर केला आहे. त्यासह महिलांनी घरगुती हिंसाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही ऐश्वर्याने दिला आहे.

अभिनेत्री आदिती राव हैदरीने देखील असाच एक पोस्ट करत या लढ्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे. (Bollywood Actresses stand against domestic violence)

तक्रार दाखल करा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्रिती सेनॉननेदेखील या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत क्रिती म्हणते, ‘आपण सर्वजण या साथीच्या आजारामुळे घरात अडकलो आहोत. मात्र, या काळात घरगुती हिंसाचार आणि लिंगभेद, छळ केल्याच्या कथित घटनांचे प्रमाण प्रत्यक्षात खूप वाढत आहे. या घटना चिंताजनक आहेत. मला वाटते की आपण सर्वांनी एकत्र येऊन या समस्येविरुद्ध लढा देणे फार महत्त्वाचे आहे. आपल्याला हिंसाचार करणाऱ्या अशा व्यक्तींबद्दल माहिती असल्यास कृपया राष्ट्रीय महिला आयोगाच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवा’, असे आवाहन तिने केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

(Bollywood Actresses stand against domestic violence)

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.