नागपुरात घरगुती वादातून मुलाकडून पित्याची हत्या

नागपुरात घरगुती वादातून मुलाकडून पित्याची हत्या

घरगुती कारणावरुन एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या 55 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केली (Boy murder father nagpur) आहे.

सचिन पाटील

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 27, 2020 | 7:06 AM

नागपूर : घरगुती कारणावरुन एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या 55 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केली (Boy murder father nagpur) आहे. ही धक्कादायक घटना काल (25 एप्रिल) नागपूरमधील हुडकेश्वर भागातील विघ्नहर्ता येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताचे नाव विजय पिल्लेवान आहे, तर आरोपी मुलाचे नाव विक्रांत पिल्लेवान असं आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली (Boy murder father nagpur) आहे.

आरोपी विक्रांत हा एक बॉडी बिल्डर आहे. त्याची स्वत:ची जीम असून तो तेथे प्रशिक्षकही आहे. विक्रांतला स्टेरॉईड आणि प्रोटीन घेण्याची सवय होती. दोन दिवसांपूर्वी त्याचे कुणाशी तरी भांडण झाल्याने मारामारी झाली होती. या मारामारीमुळे त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्याच्या मित्रांनी काल त्याचे सिटी स्कॅन करुन घेतले होते. ज्यामध्ये त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले होते. काल घरातील सर्वजण टीव्ही कार्यक्रम बघत असताना विक्रांत अचानक हिंसक झाला.

यावेळी त्याने शेजाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच घरातील भिंतीवर लाथा मारु लागला. त्यामुळे त्याचे वडील त्याची समजूत काढत होते. यावेळी विक्रांतने वडिलांना मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच स्वयपाक घरातील चाकूने वडिलांचा गळा चिरला. हा धक्कादायक प्रकार पाहून विक्रांतची आई आणि बहिण जोरजोरात ओरडू लागली. यावेळी शेजाऱ्यांनी हुडकेश्वर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली.

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे.

संबंधित बातम्या : 

नागपुरात दोन महिन्यात तब्बल 19 खून

वहिनी आणि पुतणीची हत्या, वासनांध दिराचा मृतदेहांवर बलात्कार


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें