प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करुन स्वत:ला सुतळी बॉम्बने उडवून दिले; मुंबईतील धक्कादायक घटना, प्रियकर अटकेत

मुंबई येथे 55 वर्षीय प्रियकराने 58 वर्षीय प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वत:ला सुतळी बाँमने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करुन स्वत:ला सुतळी बॉम्बने उडवून दिले; मुंबईतील धक्कादायक घटना, प्रियकर अटकेत
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 4:44 PM

मुंबई : मुंबई येथे 55 वर्षीय प्रियकराने 58 वर्षीय प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न केला (Boyfriend Try To Kill Woman) आणि त्यानंतर स्वत:ला सुतळी बॉम्बने उडवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मालाडच्या पूर्व कुरार पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. याप्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. या घटनेत प्रियकर आणि प्रेयसी दोघेही गंभीर जखमी झाले असून कूपर रुग्णालयात त्यांचा उपचार सुरु आहेत (Boyfriend Try To Kill Woman).

मालाड पूर्व येथील कुरार गावातील पुष्पापार्क येथे ही घटना घडली. येथील 58 वर्षीय घटस्फोटीत महिला 80 वर्षीय वृद्ध आईसोबत राहात होती. या महिलेला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. ते त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहतात.

या महिलेचं 55 वर्षीय कार ड्रायव्हर सचिन चौहानवर प्रेम होतं. ते गेल्या 15 वर्षांपासून सोबत होते. त्यामुळे सचिन हा नेहमी प्रेयसीच्या घरी येत होता.

15 नोव्हेंबरला सकाळी सात वाजताच्या सुमारास प्रेयसीच्या घरी भेटायला आला तेव्हा प्रेयसी कामाला जाण्यासाठी तयार होत होती. प्रियकराने प्रेयसीला त्याचे कपडे मागितले. त्यावरुन या दोघांमध्ये वाद झाला.

त्यानंतर प्रियकराने सोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केले. जेव्हा प्रेयसी आपला बचाव करु लागली, तेव्हा या निर्दयी प्रियकराने तिच्या चेहऱ्यावरही वार केले. जेव्हा प्रेयसी जखमी होवून पडली तेव्हा त्याने सुतळी बॉम्ब जाळला आणि आपल्या तोंडात टाकून स्वत:ला उडवून घेतलं. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सध्या प्रियकर सचिनवर कलम 307, 309 अंतर्गत हत्येचा प्रयत्न आणि आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Boyfriend Try To Kill Woman

संबंधित बातम्या :

विरारमध्ये जबरी चोरीचा 6 दिवसात छडा, 4 कोटीची रोकड घेऊन पळालेले चोरटे पकडले

50 हून अधिक घरफोडी करणारे सर्राइत चोरटे जेरबंद, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.