5

शेजाऱ्यांचं पाहून दोन भावांचा खारी विक्रीचा धंदा, मात्र व्यावसायिक वादातून एकाची निघृण हत्या

कल्याणच्या वालधूनी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे (bread seller murdered neighbour for start selling bread).

शेजाऱ्यांचं पाहून दोन भावांचा खारी विक्रीचा धंदा, मात्र व्यावसायिक वादातून एकाची निघृण हत्या
Follow us
| Updated on: Aug 24, 2020 | 8:22 PM

ठाणे : लॉकडाऊन काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेजाऱ्याला पाहून दोन भावंडांनी खारी-पाव विक्रीचा व्यवसाय सुरु केला. मात्र, आमचाच धंदा तुम्ही का सुरु केला? असा सवाल करत शेजारी राहणाऱ्या तीन जणांनी मिळून दोन भावांपैकी एकाची हत्या केली. कल्याणच्या वालधूनी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सल्लाउद्दीन अन्सारी, कशीमुद्दीन अन्सारी, मियाद अन्सारी या तिघांना अटक केली आहे (bread seller murdered neighbour for start selling bread).

कल्याणमधील वालधूनी परिसरात अमर कनोजिया यांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. अमर यांचे भाऊ रोशनलाल हे रिक्षाचालक आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊन काळात लॉण्ड्री आणि रिक्षा हे दोन्ही व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले (bread seller murdered neighbour for start selling bread).

हेही वाचा : Mahad Building Collapse | अवघी 10 वर्षे जुनी इमारत, पत्त्याप्रमाणे कोसळली, नेमकं काय घडलं?

अमर कनोजिया यांच्याशेजारी सल्लाद्दीन अन्सारी यांचा खारी-पाव विक्रीचा व्यवसाय होता. लॉकडाऊन काळात अमर आणि रोशनलाल आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनीदेखील खारी-पाव विक्रीचा व्यवसाय सुरु केला. हे पाहून घराशेजारी राहणाऱ्या सल्लाउद्दीनला राग आला.

कोणतेही कारण शोधून सल्लाउद्दीन हा अमर आणि रोशनलाल यांच्यासोबत भांडण करायचा. मात्र, यावेळी त्याने त्याहीपुढे जाऊन रोशनलाल यांच्यावर हल्ला केला. यावेळी सल्लाउद्दीनचे दोन साथीदार सोबत होते. या मारहाणीदरम्यान रोशनलाल यांचा मृत्यू झाला. यावेळी रोशनलाल यांचे भाऊ अमरला यांनाही मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, सल्लाउद्दीनला आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रोशनलाल यांची मोठी मुलगी शांती यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले