Maharashtra Corona Live | राज्यात कोरोनाचे 597 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 9915 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Maharashtra Corona live update) एक नजर

Maharashtra Corona Live | राज्यात कोरोनाचे 597 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 9915 वर
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 8:57 PM

[svt-event title=”राज्यात आज कोरोनाचे 597 नवे रुग्ण” date=”29/04/2020,8:53PM” class=”svt-cd-green” ] राज्यात आज कोरोनाचे 597 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 वर, आज 32 रुग्णांचा मृत्यू, मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 6644 वर

[/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात 516 उद्योगांना परवानगी,19 कंपन्यांमध्ये उत्पादनही सुरु” date=”29/04/2020,5:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत मोठ्या शिताफीने पकडून कोठडीत डांबलं; आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; 30 पोलीस क्वारंटाईन” date=”29/04/2020,5:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”630 किमीचा प्रवास, 70 बसवर 140 चालक, कोटाहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्याहून एसटी रवाना ” date=”29/04/2020,5:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : खासदार हुसेन दलवाई” date=”29/04/2020,5:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र” date=”29/04/2020,5:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आमच्या घरी बाळ जन्मलं, ब्रिटीश पंतप्रधानांची घोषणा, 55 वर्षांचे बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा” date=”29/04/2020,5:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वरळीकरांना दिलासा, 200 रुग्ण कोरोनामुक्त ” date=”29/04/2020,5:19PM” class=”svt-cd-green” ] जी दक्षिण विभागातील 200 हून अधिक रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून पालिकेच्या जी दक्षिण विभागाचे कौतुक केले. [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत” date=”29/04/2020,5:17PM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत करण्यात आली आहे. 11 लाख 88 हजार 149 चा धनादेश सहायता निधीच्या खात्यात जमा केला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी आता रोबोट” date=”29/04/2020,5:07PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी आता रोबोटचा वापर केला जाणार आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई रुग्णालयात रोबोट सध्या कार्यरत आहे. 50 मीटर ते 70 मीटरच्या अंतरावर हा रोबोट रिमोटच्या मदतीनं काम करतो. एका बटनाच्या क्लिकवर कोरोना पेशंटच्या बेडपर्यंत जेवण, नाश्ता, पाण्याची बॉटल आणि औषधे पोहोचवतो. रोबोटसाठी पंचेचाळीस ते पन्नास हजाराचा खर्च आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात कोरोनाचा दुसरा बळी” date=”29/04/2020,5:04PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. मोमीनपूरा भागातील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरु होते. नागपुरात कोरोनामुळे मृताचा आकडा दोनवर पोहोचला आहे. एकूण कोरोना बधितांची संख्या 137 झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दोन तासांची मुदतवाढ ” date=”29/04/2020,4:59PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दोन तासांची मुदतवाढ करण्यात आली आहे. मात्र अशाही परिस्थितीत पुण्यातील नागिरक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नाहीत. मटणासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कामावर दांडी मारल्याने बारा शिक्षकांना निलंबित ” date=”29/04/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाच्या कामासाठी नेमलेल्या महानगरपालिकेच्या उपशिक्षकांनी दांडी मारल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या उपशिक्षकांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली असून याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिलेत. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव” date=”29/04/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भुदरगड तालुक्यातील आकुर्डी इथं कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. मुंबई, सावंतवाडी असा प्रवास करून रुग्ण आकुर्डीत आल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 12 वर पोहोचली आहे. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमुळे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण घटले” date=”29/04/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमुळे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण घटले. पुणे शहरात मागील तीन वर्षांतील मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या तुलनेत यंदा मात्र अपघात आणि मृत्यूचे प्रमाण घटल्याचे समोर आलं आहे. मार्च महिन्यात 30 अपघात, ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 43 जण जखमी झाले आहेत. तर एप्रिल महिन्यात 3 अपघातात 2 जणांचा मृत्यू आणि एक जखमी झाला आहे. शहरात असणाऱ्या संचारबंदीमुळे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवड शहरात आणखी 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह” date=”29/04/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवड शहरात आणखी 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांमध्ये शहरातील 5 तर शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 48 तासात 30 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडलेली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता 115 वर पोहचला आहे. यापैकी 31 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत तर 4 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्गात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण” date=”29/04/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्गात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. कुडाळ येथील 15 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 20 तारखेला लॉकडाऊन असताना मुंबईच्या हाॉटस्पॉटमधून ही तरुणी सिंधुदुर्गात आली होती. मुलीच्या पालकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रूग्ण मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मात्र पुन्हा नविन रूग्ण मिळाल्याने आरोग्य यंञणा अलर्ट झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पंढरपूर येथे पोलिसावर प्राणघातक हल्ला” date=”29/04/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर येथील वेळापूरजवळ पोलिसावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. कोरोनाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या जावेद जमादार या पोलिसावर मळोली गावातील एका माथेफिरुन ब्लेडने हल्ला केला. आरोपी अरूणसिंह जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. [/svt-event]

[svt-event title=” नागपूरच्या सातरंजीपुरा भागात जीआरपी, एसआरपीएफ तैनात” date=”29/04/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या सातरंजीपुरा भागात जीआरपी, एसआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. सातरंजीपुरा नागपूरमधील कोरोना हॉटस्पॉट ठरलं आहे. या भागातील जवळपास 1200 नागरिकांना क्वारंटाऊन करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या मदतीसाठी एसआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. एकूण 200 जवान वेगवेगळ्या भागात तैनात केले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई एपीएमसी धान्य बाजारात आणखी 4 नवे रुग्ण ” date=”29/04/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] मुंबई एपीएमसी धान्य बाजारात आणखी 4 नवे रुग्ण आढळले आहेत. धान्य मार्केटच्या G, L ,P या विंगमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेने या तिन्ही विंग सील केल्या आहेत. एपीएमसीमधील रुग्णांचा एकूण आकडा 16 वर पोहोचला आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये लॉकडाऊन आता आणखी कडक ” date=”29/04/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये लॉकडाऊन आता आणखी कडक होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने फक्त 11 वाजेपर्यंत राहणार सुरू राहणार आहेत. रेड झोनमधील बँका पूर्णपणे बंद राहणार आहेत. मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता औरंगाबादेत 11 नंतर कडकडीत बंद असणार आहे. औरंगाबाद पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.