सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ, लग्नानंतर पाच महिन्यात विवाहितेची आत्महत्या

सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Bride suicide due to Dowry Harassment) केली. पहिली दिवाळी आटोपून सासरी आल्यानंतर ही घटना घडली. काजल विशाल काटकर असे या मृत महिलेचे नाव आहे.

सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ, लग्नानंतर पाच महिन्यात विवाहितेची आत्महत्या
Follow us
| Updated on: Nov 15, 2019 | 11:01 PM

यवतमाळ : सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Bride suicide due to Dowry Harassment) केली. पहिली दिवाळी आटोपून सासरी आल्यानंतर ही घटना घडली. काजल विशाल काटकर असे या मृत महिलेचे नाव आहे. मात्र तिच्या आत्महत्येनंतर सासरच्या मंडळींनी तिला मारल्याचा आरोप तिचा भाऊ जगदीश काळे यांनी केला (Bride suicide due to Dowry Harassment) आहे. याप्रकरणी यवतमाळच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या पाच महिन्यानंतर विवाहितेला आत्महत्या करावी लागल्याने हळहळ व्यक्त होत (Bride suicide due to Dowry Harassment) आहे.

काजलचा विवाह 11 जुलै 2019 ला रितीरिवाजानुसार झाला होता. सासरच्या लोकांनी सुरुवातीचे काही दिवस चांगले वागवले. त्यानंतर पाच लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरु केला. याची माहिती काजलने माहेरी सांगितली. मात्र सर्व सुरळीत होईल, असे म्हणत तिच्या माहेरच्यांनी समजूत काढली. ती दिवाळी निमित्ताने माहेरी आली होती. दिवाळीनंतर परत सासरी गेल्यानंतर काजलने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या माहेरी नातेवाईकांना कळवण्यात आली.

यानंतर तिच्या माहेरच्याकडून पती विशाल, सासू प्रतिभा, सासरे ज्ञानेश्वर, नणंद प्रीती बुटले, शैलेश बुटले, शिल्पा शिरभाते, संदीप शिरभाते यांच्यावर छळ केल्याचे आरोप करण्यात आले. आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात धडक (Bride suicide due to Dowry Harassment) दिली.

या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांकडून पती विशाल काटकर, नंदइ संदीप शिरभाते या दोघांना अटक केली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.